Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम

Webdunia
नागपूर प्रशासनाने विधानसभेसाठी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या परिक्षेत्रातील रिसॉर्ट आणि हॉटेलमध्ये भरघोष सूट मिळवा अशी युक्ती लढवली आहे. येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान करा आणि दुसऱ्या दिवशीपासून पेंच प्रकल्पाच्या परिक्षेत्रात फिरायला निघा. या ठिकाणी राहण्याची किंवा खाण्याची चिंता करु नका. कारण या परिक्षेत्रातील एमटीडीसीसह इतर कोणत्याही रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये तुम्हाला 10 टक्क्यांपासून 25 टक्के सूट मिळू शकते. मतदान केल्यानंतर 15 दिवसांपर्यंत ही ऑफर असणार आहे. 
 
नागपूरमध्ये रामटेक परिक्षेत्रात पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी धार्मिक स्थळ सुद्धा आहे. शिवाय एमटीडीसीपासून खासगी मोठे रिसोर्ट आणि हॉटेल्सही पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि हॉटेल असोसिएशनने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments