rashifal-2026

मकर संक्रांतीला तिळाचे काय महत्व, सूर्य आणि शनीची रोचक कथा वाचा

Webdunia
भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला महत्व आहे. मकर संक्रांतीत तिळाला जास्त महत्व असते. संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याला प्राधान्य दिले जाते. या तिळाला का महत्व आलेय, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर जाणून घ्या या मागील रोचक कथा-
 
एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतः पासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्यांने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला. त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला.
 
वडिलांना या त्रासात बघून यमराज (हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्या चे पुत्र होय). यांनी तपश्चर्या केली. त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले. 
 
सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छाया देवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर(कुंभ- ही शनीची रास आहे) जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला.
 
यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांचा घरी गेले. कुंभ ला पेटविल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्वे काही जळाले होते. त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर 'मकर' दिले.
 
 त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनी देवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्व आहे. 
 
तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात. असे मानले जाते की, तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती, त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखी वाढते. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

Margashirsha Guruvar 2025 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा

घरात अश्या प्रकारे कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती मिळेल

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments