Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षण प्रश्नी आज सर्वपक्षीय बैठक

Webdunia
शनिवार, 28 जुलै 2018 (09:08 IST)
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावावा अशीही आग्रही मागणी होते आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम या पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणावर या सगळ्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेतले जाणार आहे. तसेच या बैठकीत या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल याचीही चर्चा केली जाणार आहे. काकासाहेब शिंदे या तरूणाचा नदीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. विधान भवनात ही बैठक दुपारी २ वाजता होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा Ambedkar Jayanti Wishes 2025 Marathi

32 Degrees of Dr. BR Ambedkar डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या ३२ पदव्या

Ambedkar Jayanti Speech 2025 डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर मराठी भाषण

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

LIVE: युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments