Marathi Biodata Maker

मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून सरकारला इशारा

Webdunia
शनिवार, 26 डिसेंबर 2020 (15:43 IST)
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आरक्षणापासून दूर लोटणारा असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाचा या निर्णयाला विरोध असून शासनानं आपला निर्णय त्वरित मागे घ्यावा. अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आला आहे.
 
मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण सिद्ध करून ईएसबीसीमध्ये घटनात्मक आरक्षण मिळवण्यासाठी ५८ मूक मोर्चे, २ ठोक मोर्चे व ४२ तरुणांचे बलिदान द्यावे लागले आहे. परंतु राज्य शासनानं केवळ मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास गटातून लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मराठा समाज आरक्षणापासून कोसो दूर लोटला जाणार आहे. आरक्षणाबद्दल न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणावर विपरित परिणाम होऊन मराठा आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता ठोक मोर्चाच्या केरे पाटील यांनी वर्तवली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंबईसह राज्यभरातील ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले

नेत्यांचे दौरे रद्द: मंत्री उदय सामंत म्हणाले-शिंदे सेनेच्या नेत्यांनी आपले नियोजित परदेश दौरे रद्द केले असून आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्याही कमी केली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ जामदारवाडी येथील धरणात अंघोळीसाठी गेलेल्या ३ शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू

पुण्यातील हडपसर येथे बॉम्बसारखी एक संशयास्पद वस्तू आढळल्याने रुग्णालयाजवळ घबराट पसरली

गुरुदेवांच्या ७० व्या जन्मोत्सवनिमित्त जागतिक शांततेचा संदेश; १८२ देशांतील लाखो लोकांनी सामूहिक ध्यानात सहभाग घेतला

पुढील लेख
Show comments