Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरती रामाची - जयजयाजी रामराया करि कृपेच छाया

Webdunia
रविवार, 10 एप्रिल 2022 (07:48 IST)
जयजयाजी रामराया करि कृपेची छाया ।
पंचारति ओवाळुनि करूं कुरवंडी पाया ॥धृ॥
ब्रह्मयाच्या वरदानें दैत्य रावणकुंभकर्ण ।
अजिंक होवुनिया देव पीडिले संपूर्ण ।
दितिकुळ तृप्त जालें भक्षुनिया ऋषिगण ॥१॥
भूभार हारावया रघुकुळीं अवतार ।
कौसल्येचे ठाईं जालें परब्रह्म साकार ।
दाशरथि रामचंद्र मूर्तिं सावळि सुंदर ।
देव पुष्पवृष्टि करिति अयोध्येसि जयजयकार ॥२॥
शेष सेवा करावया जाला बंधु लक्षुमण ।
ताटिकेसी मारियलें केलें मखाचें रक्षण ।
शिवचाप भंगोनिया वरिली सीता सुलक्षण ।
भार्गवाचा गर्व हरिला येतां अयुध्येलागुन ॥३॥
पितृआज्ञे वनवास देवकार्यार्थ केला ।
सुग्रिवादि वानरांचा समुदाय मेळविला ।
पाण्यावरि दगडाचा दृढसेतु बांधिला ।
रावणातें दंडुनिया सीताशोक निवारिला ॥४॥
पुष्पकविमानांत सीतारामलक्षुमण ।
नळनीळ जांबुवंत सुग्रिव भक्त हनुमान ।
अयोध्येसि येते जाले भरतासि संबोखुन ।
रघुराज गुरुपायीं ठेवि मस्तक निरंजन ॥५॥
 

संबंधित माहिती

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

गुढीपाडवा सणाबद्दल विचारले जाणारे प्रश्न

श्री गणपती स्तोत्र : प्रणम्य शिरसा देवं...

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची गोवा उमेदवारांची यादी जाहीर

ही कंपनी ब्रेकअपमधून सावरण्यासाठी एक आठवड्याची रजा देणार!

पैशाच्या वादातून सहकाऱ्याची हत्या, आरोपीला अटक

दिल्लीत लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुण्यात भरधाव कारने दोघांना उडवलं, आरोपी कार चालक ताब्यात

पुढील लेख
Show comments