Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री अनंताची आरती Arati Anantachi

Webdunia
जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।।
 
भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिती अनंत नामानें ।।1।।
 
नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनि ब्राह्मण संतर्पण करिती ।।2।।
 
अपूप वायन दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत संतुष्टोनि देती संतति संपत्ती ।।3।।
 
रामा धर्मा आचरिता व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौंडिण्याने पुजिता तुजला उद्धरिले त्याला ।।4।।
 
मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता अपुल्या दासासी ।।5।।
ALSO READ: Anant Chaturdashi 2022 Katha अनंत चतुर्दशी व्रत कथा
ALSO READ: Anant Vrat 2022 Puja Vidhi अनंत चतुर्दशी मुहूर्त व्रत विधि

संबंधित माहिती

केव्हा आहे ईद-उल-फितर 2024

जर दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल तर अशा प्रकारे पूर्ण पूजेचे फळ मिळवा

चैत्र नवरात्रीत 5 दुर्मिळ राजयोग तयार होत आहे, या 5 राशीच्या लोकांचे नशीब बदलेल

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब का खातात?

आरती मंगळवारची

मोझांबिक बेटाजवळ खचाखच भरलेली बोट उलटली; 97 लोकांचा मृत्यू

सिंधू आणि लक्ष्यासाठी कडक आव्हान

बलुचिस्तानमध्ये एकामागून एक बॉम्बस्फोटां मुळे पोलिसासह तिघांचा मृत्यू

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

प्रज्ञानानंद,आणि वैशाली यांचा मोठा विजय

पुढील लेख
Show comments