आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता। स्वामी अवधूता । चिन्मय, सुखधामी जाउनि, पहुडा एकान्ता ।। वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडिला । गुरु हा चौक झाडिला।। तयावरि सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।। पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ति ।। सुंदर नवविधा भक्ति ।। ज्ञानाच्या समया उजळुनि लाविल्या ज्योती ।।२।। भावार्थाचा मंचक ह्दयाकाशीं टांगिला...