Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 01 ते 7 जानेवारी 2017

Webdunia
शनिवार, 31 डिसेंबर 2016 (17:23 IST)
मेष :  या आठवड्यात तुमच्या राशीतून सूर्य बुध आणि धनू राशीत अर्थात भाग्यस्थानात भ्रमण करत आहे. तृतीयेश तथा षष्ठेश वक्री बुध तुमच्या कामात वाढ करवेल, पण त्यात व्यत्यय येईल. त्याशिवाय पंचमेश सूर्य जो भाग्यस्थानातून जात आहे तो आर्थिक विषयांमध्ये प्रगतीची संधी देईल. तुमच्या राशीतून मंगळ, शुक्र व केतू अकरावी राशी कुंभमधून जात आहे. लग्नेश व अष्टमेश मंगळ शारीरिक तथा मानसिक तंदुरुस्ती वाढवेल. धनेश तथा सप्तमेश शुक्र आर्थिक बाबींमध्ये तथा पारिवारिक, दांपत्य व सार्वजनिक जीवन किंवा व्यापारिक संबंधांमध्ये शुभ परिणाम देईल.
 
वृषभ : या वेळेस तुमचा चंद्र नवव्या भावात अर्थात तुमच्या भाग्य स्थानात भ्रमण करेल. हा तुमच्या विचारांमध्ये स्थिरता आणि धार्मिक बाबींवर तुमची आवड निमाण करवेल. मनात बेचैनी राहील. विचार सतत परिवर्तनशील राहतील. 2 तारखेनंतर तुमच्या दहाव्या भावातून चार ग्रह जात आहे ज्याने तुमचे मन अस्थिर राहील. कुठल्या ही विषयावर निर्णय घेण्यास तुमची मनस्थिति सतत बदलत राहणार आहे. कामात व्यत्यय येतील. विपरीत लिंगी जातका प्रती आकर्षण राहणार आहे. जोडीदाराशी मतभेद होतील.
 
मिथुन : या आठवड्या तुमच्या राशीतून सातवे सूर्य आणि बुध आणि भाग्य भावातून शुक्र-मंगळाचे परिभ्रमण तुमचे काम वाढवेल. भाग्याचा साथ मिळेल तसेच जास्त मेहनत ही करावी लागणार आहे. आर्थिक लाभ प्राप्त कराल आणि विपरीत लिंग असणार्‍या व्यक्ती प्रती तुम्ही आकर्षिक व्हाल आणि त्यांच्याशी तुमचे संबंध बनतील. ग्रहांची स्थिती येणार्‍या काळात विदेशातून लाभ मिळण्याचे संकेत देत आहे आणि कन्या राशीचा गुरू नवीन काम करवेल. गुरू चवथ्या स्थानात असल्यामुळे व्यापारात गुंतवणून कराल आणि त्याच्या विस्तारासाठी खर्च करण्याची शक्यता देखील आहे.
 
कर्क : या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चंद्र तुमच्या राशीतून सातव्या भावात अर्थात मकर राशीत राहणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे. बर्‍याच प्रकरणांमध्ये तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे असेल. चंद्रातून आठव्या स्थानात शुक्र, मंगळ आणि केतू असल्यामुळे ऐकूण वेळ मध्यम राहणार आहे. आर्थिक विषयांमध्ये थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
 
सिंह : या आठवड्यात राशी स्वामी सूर्य धनू राशीत बुधासोबत मंगळ - शुक्र - केतु कुंभमध्ये, गुरू कन्या मध्ये, शनि - वृश्चिकमध्ये, राहु - सिंहमध्ये चंद्र मकरमध्ये भ्रमण करत आहे. या आठवड्यात आणि संपूर्ण वर्षात सिंहचा राहु महत्वकांक्षा वाढवेल. थोडे स्वलक्षी होऊन समाजाच्या निती नियमांच्या विरुद्ध जात आहे. तारीख 1 मध्यम राहील पण व्यवसायिकांसाठी हे उत्तम राहणार आहे, त्यांना अधिक आय होण्याची शक्यता आहे. धनप्राप्ति होईल.
 
कन्या : आठवड्याच्या सुरुवातीत बघितले तर तुमच्या राशीतून गुरू भ्रमण करत आहे. शनी तृतीय स्थानातून आणि सूर्य-बुध चतुर्थ स्थानातून भ्रमण करत आहे. चंद्र पांचव्या आणि शुक्र-मंगळ-केतू सहाव्या स्थानातून आणि राहु बाराव्या स्थानातून भ्रमण करत आहे. ग्रहांची स्थिती, अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. प्रतियोगी परीक्षेची तयारी चांगल्याप्रकारे करू शकता. प्रेम-प्रसंगासाठी देखील वेळ उत्तम आहे. खासकरून आठवड्याच्या सुरुवातीत प्रवास योग घडू शकतो.
 
तूळ : तुला जातकांसाठी आठवड्याच्या सुरुवातीत शुक्राचे मित्र राशित आणि दशमेश चंद्र तिसर्‍या भावात शनिची दृष्टी असल्यामुळे कार्यक्षेत्रात चांगले परिवर्तन येतील किंवा एखादे अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही नवीन काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीत चंद्राचे शनिवर दृष्टि असल्याने कामाची सुरुवात हळू होण्याची शक्यता आहे.
 
वृश्चिक : या आठवड्यात तुमच्या वृश्चिक राशित सूर्य व बुधाचे दुसर्‍या भावात भ्रमण असल्याने फारच उत्तम वेळ आहे. पारिवारिक खर्चाची मात्रा जास्त राहणार आहे. उत्तम कार्यांमध्ये धन खर्च होईल. तुमच्यात बौद्धिकता असेल. तुमच्या वाणीत गोडवा राहणार आहे. परिवारात थोडे मतभेद व संघर्ष राहतील, पण तुम्ही युक्तीपूर्वक त्यातून बाहेर निघण्यात यशस्वी व्हाल.
 
धनू : नवीन वर्ष आणि आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी उत्साह आणि उमंगाने भरपूर असेल. वैवाहिक जीवन आणि जोडीदारासोबत  मधुर आणि अनुकूल संबंध बनतील. धन आणि आमदनीचे स्त्रोत उत्तम राहतील आणि त्यात वाढ होताना दिसेल. भाऊ, बहिणींसोबत संबंध आंबट गोड राहणार आहे. परिवार, माता-पिता आणि सासु-सासर्‍यांसोबत संबंध मधुर आणि मानपूर्ण राहतील. प्रेम आणि शिक्षासाठी एखादी परेशानीसोबत ऐकूण शांती आणि उत्साहपूर्ण वातावरण मिळाल्याने तुम्ही शिक्षाकडे लक्ष द्याल.
 
मकर : 1 तारखेला शनी व गुरुच्या दृष्टीमुळे शांती असेल. कुंभ राशित मंगळ - केतूचा योग असल्याने जातकाची भाषा थोडी कडक राहणार आहे. दुसर्‍या तारखेला चंद्र परिवर्तन करून कुंभ राशित भ्रमण करत आहे. 2, 3 तारीखेत जातकाला मानसिक अशांति, बेचैनी, कमी झोन येईल. या वेळेस तुमचे घरातील सदस्यांसोबत मतभेद होतील. 3 तारखेपासून विद्यार्थी वर्गासाठी मानसिक चिंतेचा काळ राहणार आहे. या वेळेस जातकाला डोके दुखी, चर्म रोग, पथरी इत्यादी रोगांची सुरुवात होऊ शकते. थोडीशी निष्काळजी मोठे आजार आणू शकतात कारण अष्टमेश - षष्ठेशची युती बाराव्यात भावात धनू राशीत होत आहे. जे जातक शेयरबाजार, सट्टेचे काम करतात त्यांना 3 तारखेपर्यंत गुंतवणूक नाही करायला पाहिजे.
 
कुंभ : नवी वर्ष 2017च्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. कुंभ राशित केतू - मंगळ - शुक्र, धनू राशीत सूर्य - बुध आणि वृश्चिकमध्ये शनी आहे.  कन्या राशित गुरू व सिंहसोबत राहू विराजमान आहे. तारीख 1 आणि 2 च्या दरम्यान तुमच्या राशीतून बाराव्या भावात चंद्र आल्याने तुमची मानसिक काळजी वाढेल आणि संतान व परिवारजनांचा साथ मिळणार नाही. कोर्ट कचेरी किंवा शत्रूंसमोर विफलता मिळेल. तारीख 3 आणि 4 च्या दरम्यान तुमच्या राशीत केतू - मंगळ - शुक्र असल्याने मनात उदासीनता, क्षोभ राहील. शुक्र - मंगळाची युतीमुळे प्रेम संबंधाचे प्रसंग बनत आहे. विपरीत लिंग वाले व्यक्तिच्या प्रती आकर्षण राहील.
 
मीन : या आठवड्यात शुक्र तुमच्या राशीतून बाराव्या भावात तुम्हाला शुभ आणि अशुभ दोन्ही फळ देणार आहे. शुक्र तुम्हाला आर्थिक लाभ देईल. पण तसेच एखाद्या चुकीच्या व्यक्तीप्रती किंवा विपरिक लिंग असणार्‍या व्यक्तीप्रती आकर्षण किंवा विपरीत लिंगच्या व्यक्तीशी संबंध बनू शकतात. या आठवड्यात सूर्य आणि बुधाची युती तुमच्या कर्म स्थानात असल्याने तुम्हाला उच्च अधिकारी, सरकारी अधिकरी आणि प्रतिष्ठित व्यक्तिंसोबत भेटीगाठीची संधी मिळेल. कार्यात यश मिळेल. नोकरीत उच्चपदवी आणि बढतीचे योग आहे. तुमचे मान, गौरव, यश आणि कीर्तिमध्ये वाढ होईल. ही वेळ सर्व प्रकारे लाभदायी सिद्ध होत आहे. व्यवसायात फायदा मिळेल. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग बनत आहे.

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

रविवारी करा आरती सूर्याची

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

पुढील लेख