Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेष राशी भविष्यफल 2019

Webdunia
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (15:40 IST)
वर्ष 2019तील सर्व राशींचे भविष्यफल जाणून घ्या 
 
मेष राशीच्या 2019 सालच्या भविष्यानुसार या राशीच्या व्यक्तींना शुक्र-शनी या ग्रहांचे उत्तम सहकार्य लाभणार आहे. पण जास्तीचा साहस टाळणे गरजेचे आहे. प्रकृती अस्थिर असेल. 2019 मध्ये मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबरला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील. हे वर्ष तुमच्यासाठी संमिश्र असेल.
 
कौटुंबिक जीवन
कौटुंबिक पातळवीर राहू मंगळ षडाष्टक योगातून गैरसमज, संशय निर्माण होतील. या वर्षी तुमच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतील. गुरु वक्री होऊन मार्गी होईल ज्या मुळे तुमच्यासाठी अडचणी उत्पन्न होतील. दुसऱ्यांबरोबर ताळमेळ ठेवावा. 6 मार्च नंतर कुटुंबातील मोठ्या व्यक्ती बरोबर तुमचे कलह वाढतील. नोव्हेंबर नंतर तुमचे पारिवारिक जीवन सामान्‍य होईल. वैवाहिक जीवन उत्तम असेल. लहान-मोठ्या समस्या येतील परंतु जास्त काळजी करण्याची गरज नाही. जोडीदाराचा साथ चांगला मिळेल. आपल्या जोडीदार सोबत वेळ व्यतीत करण्याची चांगली संधी मिळेल. दोघांच्यात परस्पर सामंजस्य वाढेल. फैमिली प्‍लानिंग बाबत विचार करू शकता.
 
आरोग्य
तुम्ही सजग असल्याने वर्षाच्या सुरुवातील तुमची प्रकृती सुदृढ असेल. या कालावधीत तुम्हाला थोडासा मानसिक ताण असेल, त्यानंतर मात्र तुमची प्रकृती स्थिर राहील. मुलांच्या आरोग्याच्या समस्येची वेळीच काळजी घ्या. जांघ, पाय आणि संधीवात व खांद्यात दुखणे वाढेल. तुमच्या वर कोणे काळा जादू करू शकेल. वजन वाढण्याची  संभावना आहे. 
 
करियर
या वर्षी विद्यार्थ्यांना यशासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. कलाकार खेळाडूंना, राजकारणी व्यक्तींना स्वत:चे अस्तित्व टिकवणे हेच आव्हानच असेल. या वर्षी तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. तुमच्या मेहेनतीमुळे तुम्हाला यश प्राप्त होईल. तुमच्या नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमचे करिअरमध्ये वरची पातळी गाठण्यासाठी तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या प्रकल्पांमध्ये खूप मेहेनत कराल. याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. करियर मध्ये चढ-उतार येतील. तुम्ही ज्या साठी प्रयत्न करताल त्याचे उलट परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. नोकरीत बदलाव करण्या साठी हे वर्ष चांगले नसेल. पुढच्या वर्षी तुम्हाला चांगले अवसर मिळतील.
 
व्यवसाय 
मेष राशीभविष्य 2019 सांगते की, या वर्षाच्या मध्यावर (जुन-जुलै) तुमच्या व्यवसायाला गती प्राप्त होईल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. मार्च पर्यंत व्यापार उत्तम चालेल. मार्च नंतर थोडे त्रास वाढतील. असफळताचा सामना करावा लागेल. अधिकतर काळापर्यंत व्‍यापारात नफा होईल आणि तुम्हाला नवीन क्‍लाइंट मिळतील. लहान असो किंवा मोठा व्यापार लाभ अवश्य होईल. नोकरदार व्यक्तींनी येत्या वर्षात काही 
मिळविण्याकरिता काही गमावण्याची तयारी ठेवावी. जुलै नंतर चांगली संधी उपलब्ध होईल. आर्थिक परिस्थितीत चढ-उतार राहील. वर्षाच्या सुरुवातीला तुमची आर्थिक बाजू बळकट असेल पण या कालावधीत तुमचा खर्च वाढलेला राहील. अचानक अनेक अनावश्यक खर्च उद्भवतील. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर आर्थिक अडचण निर्माण होईल. 23 मार्चपर्यंत नवीन उद्योगधंदे, नवीन योजना आखू नयेत तसेच जमिनी स्थावर 
इस्टेटीचे व्यवहार तूर्त टाळावे. परदेश व्यवहारांना त्याच सुमारास चालना मिळेल. चालू असलेल्या कामतून विस्तार करण्याचे बेत मनात येतील. 
 
रोमांस
या वर्षी तुमची लव लाइफ सामान्‍य राहणार आहे. परस्पर संबंधात प्रेम वाढेल. प्रेम संबंधात मानसिक संतुष्टि मिळेल. या वर्षी दुसऱ्या धर्माच्या व्यक्ती वर प्रेम कराल. सांसारिक जीवनामध्ये मौजमजा त्यामानाने कमीच राहणार आहे. उलट कर्तव्याला प्राधन्य मिळाल्याने जवळजवळ जलैपर्यंत तुम्हाला व्यक्तिगत इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून काम करावे लागेल. तुमच्या शृंगारिक आयुष्यात फारसा बदल होणार नाही. तुमचे नाते खास राहावे, असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पारदर्शक वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे.
 
उपाय
मेष व्यक्तीच्या लोकांना रोज संध्याकाळी हनुमान चाळीसा वाचावी. शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

आरती शुक्रवारची

।। श्री दत्तगुरूंची आरती ।।

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments