Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एप्रिल 2019 तुमच्यासाठी कसा जाणार आहे जाणून घ्या...

Webdunia
रविवार, 31 मार्च 2019 (13:16 IST)
मेष : पूर्वी घेतलेली कर्जे, कामगारांचे प्रश्न आणि बाजारातील घडामोडी यावर मात करण्यासाठी वर्षभर सतर्क राहावे लागेल. स्वत:ची मर्यादा ओलांडू नका. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. प्रवास घडेल. परदेशवारीही करण्याची शक्यता आहे. गृहसौख्य व आरोग्यमान : गुरूचे पाठबळ चांगले लाभल्यामुळे छंद व व्यासंग जोपासून घरात खेळकर वातावरण ठेवता येईल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष चांगले आहे, पण इतर ग्रहांची फारशी साथ नसल्यामुळे त्याचा तुम्हाला पुरेपूर आनंद घेता येणार नाही. नवीन वाहन, जागा खरेदी अशी कामे एप्रिलपर्यंत पार पाडावीत. कर्जाचा बोजा वाढवू नका. मुलांकडून एखादी सुखद वार्ता कळेल. 

वृषभ : नोकरदार व्यक्तींना एप्रिलपर्यंत एखादी चांगली संधी उपलब्ध होईल. त्यांच्या कौशल्याला मागणी राहील, पण मोबदल्याविषयी खात्री नसल्यामुळे कामात फारसे लक्ष नसेल. त्यानंतर मात्र एखादी मोठी जबाबदारी किंवा प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. त्याचा चांगला उपयोग होईल. त्यानिमित्ताने विशेष सवलती मिळतील. आर्थिकदृष्टया जरी महिना साधारण गेला तरी तुमच्या अधिकारात वाढ होईल. इंजिनियर, शास्त्रीय शाखेत काम करणार्‍या मंडळींना एप्रिलमध्ये एखादी सुंदर कल्पना सुचून ते आपले नैपुण्य सिद्ध करतील. प्रकृतीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.  

मिथुन : कारखानदारांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पैसे किंवा गुंतवणूक करावी लागेल. जादा पैशाच्या मोहाने अयोग्य व्यक्तींशी संगत करून नका आणि बेकायदेशीर कामांपासून लांब रहा. नोकरीत अपेक्षित कामे होतील. पगारवाढ, बढतीची शक्यता आहे. जुनी आर्थिक येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने वर्ष संमिश्र आहे. एप्रिलपर्यंत तुमच्याच कामाच्या व्यवधानामुळे तुम्ही सांसारिक जीवनाला म्हणावा तसा न्याय देऊ शकणार नाही. या दरम्यान घरात नवीन बालकाचे आगमन होण्याची शक्यता आहे. प्रकृतीची कुरबूर राहील. मुलांकडून सुर्वाता कळेल. एकंदरीत सकारात्मक दृष्टिकोन राहील. आर्थिक चिंता मिटेल. 

कर्क : देशात किंवा परदेशात नवीन शाखा उघडून कामात नोकरदार व्यक्तींना त्यांचे कौशल्य पणाला लावून उत्तम कामगिरी करता येईल. संस्थेच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचे काम हाताळण्याची संधी मिळेल. अतिश्रमामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. महिला आपली जबाबदारी उत्तम पार पाडू शकतील. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने वर्ष चांगले आहे. लांबचा प्रवास, घरातील शुभकार्य, खरेदी यातून जीवनाचा एक वेगळा आनंद मिळेल. तरुण-तरुणींना आपला जीवनसाथ निवडण्यात यश येईल. महिलांना कार्याची जबाबदारी पार पाडता येईल.  

सिंह : मार्चपर्यंत कमाई जरी समाधानकारक असली तरी वाढत्या खर्चामुळे पैसे हातात शिल्लक राहणार नाही. त्यानंतर पैसे मिळतील, पण ते नवीन गुंवणुकीकरिता वापरावे लागतील. सामाजिक व शैक्षणिक क्षे‍त्रातील व्यक्तींना अधिक मान, प्रतिष्ठा प्राप्त होईल. महिला जबाबदारी समर्थपणे पार पाडतील. तरुणांनी एप्रिल महिन्यात विवाहाच्या प्रश्नावर शिक्कामोर्तब करावे. यंदा नवीन वास्तूचा, स्थावरचा विचारही यशस्वी होईल. वरिष्ठ व घरातील अनुभवी व्यक्तींशी संघर्ष करू नये. 

कन्या : मुलांची अभ्यासातील प्रगती चांगली असेल. उच्च शिक्षणाकरिता किंवा कामाकरिता ज्यांना देशात अथवा परदेशात जायचे असेल त्यांना संपूर्ण महिना चांगला आहे. तरुणांना करिअरमधील प्रगती उत्तेजित करीत राहील. कौशल्य वाढविण्याकरिता त्यांना प्रशिक्षण घ्यावेसे वाटेल. गुरुचे भ्रमण दशमस्थानात आणि लाभस्थानात असल्यामुळे वैवाहिक जीवनातील गृहसौख्याच्या तुमच्या कल्पना दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत. घरातील वयोवृद्ध व अनुभवी मंडळीबरोबर संघर्ष न करता खेळकर दृष्टिकोन ठेवून मिळेल ते पदरात पाडून घ्याल.  

तूळ : एप्रिल महिन्यात नवीन करार करताना बेसावध राहू नका. नोकरदार व्यक्तींच्या बर्‍याच वर्षाच्या इच्‍छा-आकांक्षा साकार करणारा महिना आहे. गाडी किंवा घर आणि इतर सुखसुविधा खरेदी करून जोडीदाराला खूश ठेवाल. जूननंतर मात्र गुरू व्यवस्थानात जाईल. त्यामुळे हात आखडता घेणेच चांगले. ज्या मुलांना उच्च शिक्षणाकरिता किंवा नोकरीनिमित्त परदेशात जायचे आहे, त्यांना एप्रिल महिना विशेष चांगला आहे. विवाहत्सुक तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल, त्याचे विवाहत रुपांतर एप्रिल महिन्यात होईल. नवविवाहितांच्या घरी एखादी सुखद बातमी कळेल. नवीन व्यक्तींशी मैत्री झाल्यामुळे जीवनामध्ये बहार येईल.  

वृश्चिक : कारखानदारांना नवीन तंत्रमान स्वीकारावे लागेल. जुने करार संपून नवीन करार होतील. परदेशातील कामला चालना मिळेल. प्रकाशक व लिखाण क्षेत्रातील लोकांना चांगली प्रसिद्धी मिळेल. या महिन्यात मंगळ बराच काळ तुमच्याच राशीत आणि व्ययस्थानात राहणार आहे. त्या व्यतिरिक्त ग्रहणे तुमच्या राशीत आणि सप्तमस्थानात पडतील याचा परिणाम कौटुंबिक सौख्यावर फारसा चांगला होणार नाही, परंतु गुरु तुम्हाला साथ देणार असल्यामुळे तुम्ही वेळ मारून नेऊ शकाल. घरामध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी सारासर विचार करून निर्णय घेणे आवण्यक आहे. प्रकृती आणि पैसा या दोन्हीबाबतीत यंदा तशा अडचणी जाणवल्या नाहीत तरी जूनपर्यंत घेऊनच पुढे जा. 

धनु : नोकरदार व्यक्ततींना ज्यांना पदोन्नती किंवा जादा पगारवाढ पाहिजे असेल, त्यांना मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. एप्रिलपर्यंत चांगल्या प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. महिला शिक्षण व कला क्षेत्रात आघाडीवर राहतील. शुक्राचे भ्रमण राशीच्या सप्तमस्थानात असल्यामुळे आला दिवस हसून साजरा कराल. याच दरम्यान घरातील सदस्य आणि त्यांच्या जीवनातील काही चंगले क्षण बघायला मिळतील. एप्रिलमध्ये एखादी चांगली घटना घडल्याने घरात वातावरण प्रसन्न राहील. घरात नव्या पाहुण्याची भर पडेल. प्रवास व तीर्थयात्रा अचानक घडून येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा व शर्यतीत आघाडीवर राहता येईल.  
मकर : ज्यांना परदेशात जायचे आहे अशा मुलांकरिता आईवडिलांना पैशाची बरीच मोठी तरतूद करावी लागेल. तरुण-तरुणींनी प्रेमसंबंधात अति घाई संकटात नेईल हे लक्षात ठेवावे. विवाहोत्सुक तरुणांना एप्रिल हा महिना अनुकूल आहेत, पण त्यांनी निर्णय घाईने घेऊ नये. या महिन्यात प्रकृतीच्या तक्रारी अगर अन्य कारणाने मानसिक अस्वस्थता जाणवेल. मात्र, काळजीचे कारण नाही. शुभ रंग पिवळा-हिरवा, शुभरत्न - पाचू, टोपाझ व आराध्य दैवत पांडुरंग-विष्णू आहे.

कुंभ : नोकरीमद्ये संस्थेकडून या महिन्याच्या सुरुवातीला बरेच प्रोत्साहन मिळेल. पगारवाढ किंवा नवीन भत्ते मिळतील. चांगल्या प्रोजेक्टकरिता निवड होईल, परंतु त्यानंतर मात्र कामाचा तणाव खूपच वाढेल. नोकरी किंवा उच्च शिक्षणाकरिता परदेशात जायचे आहे, त्यांना बरेच कष्ट पडतील. प्रॉपर्टी किंवा घरामधले बराच काळ रेंगाळत पडलेले प्रश्न असतील तर तडजोडीतून सुवर्णमध्य काढा. विवाहोत्सुकांना कौटुंबिक जीवनात पदार्पण करता येईल. गुरूचे पाठबळ चांगले लाभत असल्यामुळे यंदा तुमच्या हातून कही घरगुती जबाबदार्‍या पार पडतील. वृद्धांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यावा. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.

मीन : महत्त्वाकांक्षी व धाडसी तरुण मंडळींनी आपले बस्तान नीट बसवून घ्यावे. त्यांना व्यवसायाची नवीन दालने खुली होतील. त्याचा त्यांनी फायदा करून घ्यावा. बदली आणि बढतीची शक्यता मार्चपर्यंत आहे. कौटुंबिक सौख्याचा दृष्टीने वर्ष आव्हानाचे आहे. जोडीदाराशी चर्चा आणि विचारविनिमय करून कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरले. वास्तूची कल्पना साकार व्हावी. विवाहेच्छू, होतकरू तरुण मंडळींचे शुभमंगल ठरावे. वि‍द्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती मात्र साधारण राहील. शुभरंभ तांबडा, शुभरत्न पोवळे व आराध्य दैवत गणपती आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Gudi Padwa 2025: गुढी पाडवा सणाबद्दल 10 खास गोष्टी

Ram Navami 2025 राम नवमी कधी? दुर्मिळ योगायोग, योग्य तारीख- शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

Sheetala Saptami 2025 शीतला सप्तमी कधी ? शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

शीतला आरती Shitala Mata Aarti

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख