Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थंडीत त्वचेची काळजी घ्या!

वेबदुनिया
हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तिची योग्य ती काळजी घेणे जरूरीचे असते. ही काळजी कशी घ्यावी याची ही माहिती.
सफा

त्वचेच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळे साबण बाजारात उपलब्ध आहेत. थंडीत जास्त तेल असणारे (टीएफएम) चांगल्या प्रतीचे साबण वापरावेत. टीएफएम जेवढा जास्त तेवढे साबणातले Oily Ingredent जास्त साबणात वापरलेली चरबी ही प्राणीज किंवा वनस्पतीज चरबी जवळजवळ सारख्याच प्रमाणात त्वचेला तेलकटपणा (मृदुता) देते. पण प्राणीज चरबी ( Fat) वापरल्याने काही जणांना एलर्जी होऊ शकते. म्हणून एलर्जीक असणार्‍यांनी प्राणीज चरबीपासून बनवलेले साबण, क्रीम किंवा बॉडीलोशन वापरू नये.


तेल/बॉडी लोशन

WD

थंडीत आंघोळीनंतर शरीर खसखसून न पुसता हळूच टिपावे. तेलाच्या हाताने हलकी मॉलिश करावी. त्यानंतर लगेच त्यावर पाणी टाकून किंवा पुसू नये, नाहीतर जे पाणी त्वचेत सामावले आहे ते उडून पुन्हा त्वचा कोरडी होईल.

सर्वसाधारणपणे खोबरेल तेलच लावावे. थंडीत ते घट्ट होत असल्याने काही लोक मोहरीचे (सरसो) तेल लावतात. सामान्य त्वचेसाठी ते ठिक आहे पण एलर्जीक व जास्त कोरडी त्वचा असणार्‍या लोकांना त्यामुळे जास्तच त्रास होतो.

या दोन तेलांखेरीज गोडं तेल (याबीन, सनफ्लॉवर, करडई, किंवा ऑलिव्ह ऑईल) पण वापरता येते. तेलाशि‍वाय, पाणी व ग्लिसरीन समप्रमाणात एकत्र करून ते आंघोळीनंतर लावल्यासही अपेक्षित परिणाम लक्षात येतो.

कपड े

WD

लोकरीचे किंवा गरम कपडे शरीराच्या वर लगेच न घालता प्रथम मऊ, सुती कपडे परिधान करून मगच त्यावर हवे तसे गरम कपडे चढवावेत.

रोग

WD

थंडीत त्वचारोगांचे प्रमाण वाढते. तारुण्यपिटीकांचे प्रमाणही वाढते. तारुण्य पिटी‍कांसाठी वापरल्या जाणार्‍या औषधांमुळे त्वचा आणखीनच कोरडी होते. म्हणून त्वचेचा कोरडेपणा दूर करणारी क्रीम त्वचा नरम करून ओलावा तर आणते पण त्यामुळे चेहर्‍यावरचे फोड (तारूण्यपिटीका) वाहू लागतात त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच क्रीम वापराव्यात.

लहान मुलांमध्ये आढळणारा Atopic Exzima थंडीत जास्तच सक्रीय होतो. यात त्वचा खूपच कोरडी होते. त्याच्या त्रासामुळे मुलांबरोबरच पूर्ण कुटुंब हैराण होते. यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराची सफाई कशी करवी, त्यानंतर कोणते क्रीम किती प्रमाणात लावावे तसेच मुलांना कसे कपडे घालावेत हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानीच करावे. वैद्य हकीम तसेच बाजारू औषधांचा प्रतिकूल परिणाम होणे स्वाभाविकच आहे. याप्रमाणे हायपोथॉयरॉईड रोगाने ग्रस्त बायका व 40 पेक्षा जास्त वय असणार्‍या व्यक्ती ज्यांची त्वचा वरचेवर कोरडी होत आहे त्यांनी थंडीत (दिवाळी ते होळी) आपली त्वचा योग्य पद्धतीने साफ करून, आंघोळीनंतर योग्य प्रमाणात योग्य क्रीम लावावे.

फुटणारे ओठ

WD

फुटलेल्या ओठांवर कधीही जीभ फिरवू नये कारण थुंकीत असणारे Enzymes त्रास वाढवतात व आपल्या ओठाजवळची त्वचा काळवंते. तसेच पाणी प्यायल्यावर लगेच ओल्या ओठांवर तूप लावावे याशिवाय योग्य व्यायाम, भरपूर पाणी, योग्य खाद्यतेलाचा जेवणात वापर तसेच Heater चा अतिरेक टाळल्यास दिवाळीपासून होळीपर्यंतचा हा काळही आनंदात व उत्साहात जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

सर्व पहा

नवीन

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

Raw or Cooked Sprouts कच्चे की उकडलेले स्प्राउट्स आरोग्यासाठी फायदेशीर ? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुढील लेख
Show comments