प्रत्येक स्त्रीचे स्वप्न आहे की तिची त्वचा चकचकीत, नितळ आणि निरोगी असावी. त्या त्वचेची काळजी घेण्यासाठी बरेच काही करतात. तरी ही त्वचा चांगली मिळत नाही. त्या त्वचेची काळजी घेताना नकळत काही चुका करतात या मुळे त्यांच्या त्वचे ला फायद्याचा ठिकाणी नुकसान होतात. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या चुका करू नये.
* नियमितपणे क्लिंजिंग न करणे-
त्वचा चकचकीत बनविण्यासाठी आतून स्वच्छ करायची गरज असते. या साठी त्वचेला क्लिंजिंग करणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच बायका या कडे लक्ष देत नाही. असं करू नका नियमितपणे क्लिंजिंग करा. मेकअप करण्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी क्लिंजिंग करा. असं केल्याने त्वचा उजळेल.
* मॉइश्चरायझर न वापरणे-
तेलकट त्वचा असणाऱ्या स्त्रियांना त्वचेला दररोज मॉइश्चरायझर लावायला पाहिजे .स्नान केल्यावर लगेचच मॉइश्चरायझर लावा या मुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते. आणि त्वचेवर लवकर सुरकुत्या येतात.
* उत्पादनांवर लक्ष नसणे-
काही उत्पादनांमध्ये बरेच घटक असे असतात ज्यांच्या मुळे आपल्या त्वचेला त्रास होऊ शकतात. कोणते ही उत्पादन वापरण्यापूर्वी तपासून बघा. या साठी तज्ज्ञाचा सल्ला घ्या.
* अयोग्य अन्न खाणे-
आपण जे काही खातो त्याचा प्रभाव आपल्या केसांवर आणि त्वचेवर पडतो. त्वचेला तजेल आणि सुंदर ठेवण्यासाठी योग्य आणि सकस आहार घ्यावा. जंक फूड खाऊ नका. पाणी भरपूर प्या. पाणी कमी प्यायल्याने त्वचेवर वाईट परिणाम होतात. त्वचा कोरडी पडेल म्हणून पाणी भरपूर प्यावे.