Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्युटी टिप्स : या 4 वस्तूंनी घरातच हर्बल स्क्रब तयार करा

ब्युटी टिप्स : या 4 वस्तूंनी घरातच हर्बल स्क्रब तयार करा
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (19:01 IST)
स्क्रब चा वापर मृत त्वचे ला काढून टाकण्यासाठी केला जातो, ही मृत त्वचा चेहऱ्यावरून निघाल्यावर त्वचा मऊ आणि चमकदार दिसते. बाजारपेठेतील मिळणारे स्क्रब वापरल्यानं त्वचेला नुकसान होऊ शकतं. घरात स्क्रब बनविल्याने चेहरा उजळेल आणि काहीही दुष्परिणाम होण्याची भीती राहणार नाही. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत घरातच काही गोष्टींना वापरून स्क्रब बनविण्याची पद्धत.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 बनाना स्क्रब- 
हे स्क्रब बनविण्यासाठी पिकलेली केळी मॅश करून या मध्ये साखर आणि एक चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. बनाना स्क्रब तयार. हे स्क्रब हळुवार हाताने चेहऱ्यावर लावून 5 मिनिटे मसाज करा नंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या.
 
2 दही आणि पपई स्क्रब -
पपई मॅश करून या मध्ये दोन चमचे दही, तीन थेंब लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा. तयार झालेल्या स्क्रब ने आपल्या त्वचेवर मसाज करून 5 मिनिटे तसेच सोडा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या.
 
3 ओट्स आणि टोमॅटो स्क्रब- 
हे स्क्रब बनविण्यासाठी ग्राउंड ओट्स आणि पिठीसाखर घेऊन मिसळा. या मिश्रणात टोमॅटो चे चिरलेले तुकडे बुडवून चेहऱ्यावर चोळा. टोमॅटो हे त्वचेला ब्लीच करण्याचे काम करतो, ओट्स त्वचेला मऊ बनवतो.
 
4 मध-संत्र स्क्रब- 
दोन चमचे संत्र्याच्या सालीची भुकटी घ्या, दोन चमचे ओट्स घ्या या मध्ये एक मोठा चमचा मध मिसळा पाणी घालून पेस्ट तयार करा. आता या स्क्रब ने हळुवारपणे हलक्या हाताने चेहऱ्यावर खालून वर नेत मसाज करा काही मिनिटे तसेच ठेवा नंतर चेहऱ्याला पाण्याने धुऊन घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चेहऱ्याचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे योगासन करा