Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्युटी टिप्स: भुवया करताना कमी वेदना होतील, या सोप्या टिप्स अवलंबवा

Webdunia
रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (15:28 IST)
भुवया सौंदर्य वाढवण्यासाठी खूप मदत करतात. परंतु भुवया योग्यरित्या बनवणे खूप महत्वाचे आहे. दुसरीकडे, जर आपण भुवया बनवण्याबद्दल बोललो, तर हे स्पष्ट होते की ते बनवणे मुलांचे खेळ नाही. कारण एक बाजू खराब झाली तर लूक खराब होतो. तर, काही महिलांना ते बनवताना इतका वेदना जाणवतात की त्यांना खूप काळजी वाटते. अनेक महिलांना वेदना सहन होत नाही आणि त्या हात काढून टाकतात, त्यामुळे काही वेळा भुवया कापण्याची शक्यताही वाढते.
 
आयब्रो बनवण्यासाठी अनेक गोष्टी अवलंबवतात. यासाठी लोक शेव्हिंग, वॅक्सिंग, प्लकिंग आणि थ्रेडिंगचा वापर करतात. जरी प्लकिंग आणि थ्रेडिंग अधिक लोकप्रिय मानले जाते. या दोन पद्धतींचा अवलंब करताना, आपल्याला वेदना होऊ नयेत असे वाटत असेल, तर या काही टिप्स अवलंबवू  शकता. चला तर मग जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आयब्रो बनवताना होणारा त्रास कमी कसा करायचा. 
 
थ्रेडिंग करताना  वेदना कशी कमी करावी
1 त्वचा घट्ट ठेवा 
थ्रेडिंग करताना वेदना होत असल्यास, त्वचा घट्ट ठेवणे आवश्यक आहे. डोळ्याच्या क्षेत्राच्या वरच्या आणि खालच्या त्वचा घट्ट करा. असे केल्याने केस सहज बाहेर येतात आणि त्वचेला जास्त इजा होत नाही. 
 
2 त्वचेला जोराने चोळा 
ज्या भागातून तुम्हाला केस काढायचे आहेत ते भाग जोराने चोळून घ्या. ज्यामुळे त्वचेवरील केस अगदी सहज बाहेर येतील. असे केल्याने अतिरिक्त तेल निघून जाते. यासोबतच फॉलिकल्सही कमकुवत होतात आणि केस सहज निघतात. 
 
3 बर्फ वापरा 
भुवयांच्या आधी त्वचेवर बर्फ वापरा. असे केल्याने त्वचा बधीर होते आणि नंतर वेदना खूप कमी होतात. थंडीत बर्फ लावावे वाटत नसेल तर चेहरा थंड पाण्याने धुवा.  
 
प्लकिंग करताना  वेदना कमी कसे करावे
 
1 केसांच्या मुळांपासून सुरुवात करा
 
बरेच लोक केसांचे टोक पकडतात आणि ओढतात, त्यामुळे केस तुटतात. त्यामुळे तो भाग स्वच्छ राहत नाही आणि पुन्हा वेदना सुरू होतात. अशावेळी केसांच्या मुळापासून सुरुवात करा आणि एका झटक्यात केस काढून टाका.
 
2 कोल्ड जेल लावा 
प्लकिंग केल्यानंतर, कोल्ड जेल लावा आणि त्या भागाला मॉइश्चरायझ करा. आपल्याला हवे असल्यास आपण एलोवेरा जेल वापरू शकता. या सर्व टिपा आपल्याला मदत करतील आणि भुवया उपटताना आराम देतील. 
 
3 शॉवर नंतर प्लकिंग करा -
आंघोळ केल्यानंतर लगेच असे केल्यास केस काढणे सोपे जाते. कारण आंघोळ करताना केसांचे कूप उघडतात आणि अशा स्थितीत केस सहज बाहेर येतात. शेव्हिंग, वॅक्सिंग, प्लकिंग करण्यापूर्वी गरम पाण्याचा शॉवर अधिक चांगला असल्याचे सिद्ध होऊ शकते
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments