Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपल्या आहारात या निवडक गोष्टींचा समावेश करा आणि चेहऱ्यावर ग्लो मिळवा

आपल्या आहारात या निवडक गोष्टींचा समावेश करा आणि चेहऱ्यावर ग्लो मिळवा
, मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (11:48 IST)
किती जरी म्हटलं तरी आपल्या जिभेचे लाड पुरविण्यासाठी आपण तळकट तुपकट खातो, ज्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर त्याचा परिणाम दिसतो. चेहऱ्याची चमक, तजेलपणा कमी होतो. पुरळ, मुरूम दिसू लागतात. आपण जे पौष्टिक पदार्थ खातो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. आपल्याला आपल्या आहारात फायबरयुक्त खाद्य पदार्थांचा समावेश करावा जेणे करून आपल्या त्वचेला पौष्टिक घटक मिळू शकतात. 
 
आपल्याला आपल्या चेहऱ्यावरील ग्लो तसेच कायम ठेवायचे असल्यास आम्ही आपणास काही उपाय सांगत आहो ते वापरल्याने आपल्या चेहऱ्यावरील ग्लो तसाच राहील. आपल्या आहारात या गोष्टींचा समावेश करावा. जेणे करून आपल्याला स्फूर्ती आणि तजेलपणा वाटेल आणि चेहऱ्यावर देखील ग्लो वाढेल. 
 
1 भोपळ्याच्या बिया - 
आपल्याला आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असल्यास आपण किमान मूठभर तरी भोपळ्याच्या बिया खाव्या. पण हे आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतल्या शिवाय करू नये. आपल्याला भोपळ्याच्या बिया बाजारपेठेत देखील मिळतील. किंवा नाही तर मग आपण घरात देखील भोपळा आणल्यावर त्याचा बिया फेकून न देता त्याला चांगल्या स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांना वाळवून वापरू शकता. या मध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळतं. ह्याचा सेवन केल्यानं आपल्याला वारंवार भूक लागत नाही आणि शरीरास ऊर्जा मिळते.
 
2 बीट - सर्वात जास्त प्रमाणात पौष्टिक घटक बीटमध्येच आढळतं. या मध्ये लोह, फॉस्फोरस,कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपर, व्हिटॅमिन सी या सारख्या पौष्टिक घटकांचा समावेश असतो. फॉस्फोरस मुले केसांची चांगली वाढ होते. त्याशिवाय आपल्या त्वचेचा रंग उजळण्यास देखील मदत होते. बीटाची कोशिंबीर तसेच बीटाचा ज्यूस देखील आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. आपण अश्या प्रकारे देखील बीट आपल्या आहारात घेऊ शकता.  
 
3 शिंगाडे - शिंगाडे हे सगळ्यांना आवडतात असे नाही. बऱ्याच लोकांना तर शिंगाडे हा प्रकारच माहीत नाही. आपण उपवासात शिंगाड्याचं पीठ वापरतोच. आपल्याला माहीत नसेल की शिंगाड्याच्या अँटी बॅक्टेरियल, अँटी ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं. शिंगाड्याचे सेवन केल्यामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो. मुरुमांपासून आपले संरक्षण होत. त्वचा तजेल होते. या मध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळत राहतो.
 
4 दही - व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात दह्यामध्ये आढळतात. त्वचेला डिटॉक्सीफाय करण्याचे कार्य दही करत. हे कार्य नैसर्गिकरीत्या केलं जातं. ह्याचा सेवन केल्यानं चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात त्या शिवाय दह्यात असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुण चेहऱ्यावरील मुरूम कमी करतात. पचन प्रक्रिया सुरळीत होऊन शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जातात. शरीर व्यवस्थितरीत्या डिटॉक्स केलं जातं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. 
 
5 सुका मेवा - सुक्या मेव्याचं सेवन आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतं. योग्य प्रमाणात सुकामेवा खाल्ल्याने आपली त्वचा तजेल नितळ आणि निरोगी राहते. या मध्ये फायबर, व्हिटॅमिन, आणि खनिज मुबलक प्रमाणात आढळतात. त्याच सह अँटी ऑक्सिडंट देखील मुबलक प्रमाणात आढळतात. बदामामुळे आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. किमान मूठभर सुकामेवा दररोज खावा.
 
6 सफरचंद - चांगल्या आरोग्यासाठी आणि आपल्याला निरोगी राहण्यासाठी दररोज एक सफरचंद खावं. हे आपल्या आरोग्याला तसेच सौंदर्याला देखील फायदेशीर असत. या मध्ये व्हिटॅमिन आणि खनिज मुबलक प्रमाणात आढळतात. हे आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतं. या मध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेच्या रंगाला उजळण्याचे काम करत.
 
टीप - हा लेख निव्वळ आपल्या माहिती साठी आहे, याचा अवलंब आपल्या आहारात करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kids Story 'मूर्ख मित्र'