आपण कायम तरुण, सुंदर रहावं असं बहुतंकानाच वाटतं. त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रिटमेंट घेण्याचं प्रमाण वाढलंय. पार्लरमध्ये फेशिअल तसंच इतर ट्रिटमेंट घेण्यासोबतच लेजर थेरेपीद्वारे सौंदर्यवृद्धी करण्याकडे अनेकींचा कल आहे. लेझर थेरेपीद्वारे स्किन टायनिंग, फेशिअल आ णि चेहर्यावर ग्लो येण्यासाठीच्या ट्रिंटमेंट्स घेतल्या जात आहेत. पार्लरच्या तुलनेत दुपटीनं महाग असूनही या ट्रिटमेंटला बरीच मागणी आहे.
लेझर थेरेपीने फेशियला, डार्क सर्कल रिमूव्हिंग ट्रिटमेंट, ग्लो पिग्मेंटेशन, सुरकुत्या घालवणं, चेहरर्यावरचे डाग दूर करणं, स्कीन टायटनिंग, परमनंट आयब्रो सेटिंग्ससरख्या ट्रिटमेंट्स घेतल्या जात आहेत.
गुलाबी ओठ चेहर्याच्या सौंदर्यात अधिक भर घालतात. लेझर ट्रिटमेंटद्वारे ओठांचा रंग बदलता येतो. परमनंट लीप कलर चेंज ही ट्रिटमेंट यासाठी घेता येईल. त्वचेला तजेला आणि उजळपणा येण्यासाठीच्या ट्रिटमेंट्सही आहेत.
स्कीन पिलिंगसाठीही लेझर थेरेपी वापरता येते. चेहर्यावर भरपूर पिग्मेंटेशन किंवा डाग असतील तर लेझर थेरेपीने ते दूर करता येतात. यानंतर केमिकल पिलिंग केलं जातं. या उपचारानंतर घरी लावण्यासाठी विविध प्रकारची क्रीम्स दिली जातात. 15 ते 20 दिवस चेहर्याची काळजी घ्यावी लागते.
लेझर फेशिअल हा प्रकारही लोकप्रिय होतोय. पण लेझर ट्रिटमेंट्स घेतल्यानंतर 15 ते 20 दिवस त्वचेला खूप जपावं लागतं. केमिकलयुक्त फेसवॉश तसंच साबणाचा वापर करता येत नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या सगळ्या सूचना पाळाव्या लागतात. तरंच या उपचार पद्धतीचा लाभ होतो.
मशीनच्या मदतीने दोन ते तीन सेटिंग्जमध्ये लेझर किरणांचा वापर करून चेहर्याचं फेशिअल केलं जाता. या ट्रिटमेंट्सनंतर विविध प्रकारची क्रीम्स लावायला दिली जातात. जवळपास सहा महिन्यांपर्यंत लेझर फेशिअलचा परिणाम दिसून येतो. त्यानंतर त्वचेवर फारशा सुरकुत्या पडत नाहीत आणि चेहरा उजळ दिसतो. त्यामुळे खिसा थोडा जास्त हलका झाला तरी महिलावर्ग अशा ट्रिटमेंट्ना पसंती देताना दिसताय.