Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्वचेची काळजी घेण्यासाठी घरीच बनवा गुलाब जल, कसे बनवायचे जाणून घ्या

Webdunia
रविवार, 5 मे 2024 (12:06 IST)
आपली त्वचा नेहमीच चमकदार राहावी या साठी अनेक जण स्किन केअर ट्रीटमेंट  घेतात.या साठी अनेक जण घरगुती उपाय अवलंबवतात. गुलाबपाणी हे त्वचेची काळजी घेणारे उत्पादन आहे, जे त्वचेला गुलाबी चमक देते.
घरगुती गुलाबपाणी त्वचेसाठी खूप गुणकारी आहे. यामुळे तुमच्या त्वचेची चमक तर कायम राहतेच पण त्याचबरोबर त्वचा हायड्रेटही राहते. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात, त्वचेची काळजी घेण्यासाठी घरीच गुलाबजल कसे बनवायचे जाणून घ्या.
साहित्य
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या 
पाणी 
 
कृती :
सर्वप्रथम गुलाबाच्या पाकळ्या चांगल्या प्रकारे धुवून घ्याव्यात. यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका. यानंतर आता पाणी मंद आचेवर उकळा. पाण्याचा रंग बदलून गुलाबाचा सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा. व्यवस्थित उकळल्यानंतर पाणी थंड होऊ द्या.
 
थंड झाल्यावर गुलाबाच्या पाकळ्या काढा आणि सुती कापडाच्या साहाय्याने पाणी व्यवस्थित गाळून घ्या. हे फिल्टर केलेले पाणी एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा. घरगुती गुलाबपाणी कोणत्याही रसायनाशिवाय बनवले जाते. अशा परिस्थितीत, आपण दिवसातून अनेक वेळा वापरू शकता. 
 
गुलाब पाण्याचे फायदे : 
गुलाबपाणी त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेला ताजेपणा देतात. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकते.
यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. 

Edited By- Priya Dixit    
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

प्रत्येक नात्यात गोडवा आणि सकारात्मकता असली पाहिजे

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

पुढील लेख
Show comments