Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Upper Lip Hair घरगुती उपायाने काढा अपर लिप्स केस

Webdunia
Remove Upper Lips Hair Naturally महिला चमकदार त्वचेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. घरगुती उपचारांपासून ते महागड्या सौंदर्य उत्पादनांपर्यंत. पण चेहऱ्यावर असलेले नको असलेले केस सौंदर्य कमी करतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हेअर रिमूव्हल क्रीम, थ्रेडिंग, ब्लीच इत्यादी लावत असाल. पण आम्ही तुम्हाला यापासून मुक्त होण्यास मदत करु शकतो कार एखाद्याला वेदना सहन करायच्या नसतील आणि हळू हळू येथील केसांची वाढ कमी करायची असेल तर तुम्ही घरच्याच नैसर्गिक उपायांच्या मदतीने वरच्या ओठांच्या केसांपासून मुक्त होऊ शकता. चला जाणून घेऊ, कसे?
 
बेसन, दही आणि हळद पेस्ट- हा पॅक टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी तसेच नको असलेल्या केसांपासून सुटका करण्यासाठी उपयुक्त आहे. ते बनवण्यासाठी एका भांड्यात दही, बेसन आणि हळद घेऊन हे मिश्रण चांगले फेटून घ्या. आता वरच्या ओठांवर लावा, कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.
 
लिंबू आणि साखर स्क्रब- या स्क्रबचा नियमित वापर करून तुम्ही वरच्या ओठांच्या केसांपासून सहज सुटका मिळवू शकता. लिंबूमध्ये ब्लीचिंग गुणधर्म आहेत, तर साखर त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करते. ते बनवण्यासाठी एका भांड्यात लिंबू आणि साखर समान प्रमाणात मिसळा, आता वरच्या ओठांवर लावा. सुमारे 15 मिनिटे सोडा. यानंतर पाण्याने चांगले धुवा.
 
मध आणि लिंबू मिश्रण- मध आणि लिंबाचा वापर करून तुम्ही अवांछित केसांपासून मुक्त होऊ शकता. यासाठी, मध आणि लिंबू यांचे मिश्रण तयार करा, आता तुम्ही त्याच्या सहाय्याने वरच्या ओठांच्या केसांचे वॅक्स करा.
 
डिस्क्लेमर : कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

घरगुती उपाय: फक्त या 2 गोष्टींनी हा नैसर्गिक बॉडी स्क्रब घरीच बनवा

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

गोमुखासनाचे फायदे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : म्हातारा भिकारी आणि राजा कृष्णदेवरायाची उदारता

ब्रेकफास्ट मध्ये बनवा पौष्टिक पोहे जाणून घ्या रेसिपी

पुढील लेख
Show comments