Festival Posters

महागड्या हँड बॅग्स खरेदी करताना ही खबरदारी घ्या

Webdunia
रविवार, 27 जुलै 2025 (00:30 IST)
आजकाल ब्रँडेड कपड्यांच्या जोडीने ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीजही वापरण्याबाबत महिला जास्त दक्ष होत आहेत. हातातली पर्स किंवा हँड बॅग, शूज पर्यंत सर्व काही एखाद्या प्रसिद्ध ब्रँडचेच वापरण्याकडे आजकाल वाढता कल दिसून येत आहे.
ALSO READ: हील्स खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
महिलांच्या बाबतीत म्हणायचे झाले, तर घराबाहेर पडताना आवर्जून बरोबर घेतली जाणारी वस्तू म्हणजे हँड बॅग, किंवा पर्स. हँड बॅग, हे आत केवळ पैसे किंवा इतर आवश्यक वस्तू ठेवण्याचे साधन राहिले नसून आता ते 'स्टाइल स्टेटमेन्ट' झाले आहे.
ALSO READ: पावसाळ्यात कोणते कपडे घालायचे आणि कोणते घालू नये जाणून घ्या
म्हणूनच सुप्रसिद्ध देशी विदेशी ब्रँडस्‌च्या हँड बॅग्सना बाजारामधे मोठी मागणी आहे. पण एखादी महागडी हँड बॅग खरेदी करताना आपण 'डुप्लिकेट' बॅग तर खरेदी करत नाही ना, याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक मोठमोठ्या ब्रँडस्‌ची नावे वापरून नकली माल विकला जात आहे.
ALSO READ: पावसाळ्यात आरामदायी आणि स्टायलिश लूक मिळवण्यासाठी या फॅशन टिप्स अवलंबवा
आपली फसवणूक होऊ नये याकरिता आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे. आपण निवडलेली बॅग  'ओरिजीनल' आहे की 'फेक' आहे हे कळणे काहीसे कठीणच म्हणावे लागेल. पण ज्या व्यक्तीला हँड बॅग्सची चांगली माहिती आहे, त्याला हा फरक कळल्यावाचून राहणार नाही. जगप्रसिद्ध ब्रँडच्या बॅग्स हाताने बनविलेल्या (हँड मेड) असतात. त्यामुळे त्यांच्यावरील शिलाई पाहून त्या लगेच ओळखता येऊ शकतात. जर बॅगवरील शिवण मशीनची असली, तर ती बॅग ओरिजीनल नाही हे समजून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

'बोटं चाटून खातील' अशी चविष्ट मसाला गिलक्याची भाजी नक्की ट्राय करा

केसातील उवा काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

मासिक पाळीत तीव्र वेदना झाल्यास काय करावे, वेदना थांबवण्याचे उपाय जाणून घ्या

Career in Dploma in Dental hygiene after class 12th : 12 वी नंतर डेंटल हाइजीन मध्ये करिअर बनवा पात्रता जाणून घ्या

नैतिक कथा : छोटासा ससा

पुढील लेख
Show comments