Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पातळ केस घनदाट करण्यासाठी मेथीदाण्याचे तेल वापरा

how to make fenugreek oil for long and thick hair  beauty tips in marathi
Webdunia
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (10:00 IST)
सुंदर आणि घनदाट लांब केस असणे प्रत्येक महिलेची आवड असते. परंतु सध्याच्या प्रदूषणांमुळे आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, बदलत्या जीवनशैली मुळे केस पातळ होत आहे. केसांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा वापर करून पातळ केस घनदाट करू शकता. हे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने काही नुकसान होणार नाही.हे निरोगी केसांना वाढवते. यासाठी आपण मेथीदाण्याचे तेल बनवून ते लावून केसांना घनदाट करू शकता . मेथीदाण्याचे तेल पूर्णपणे नैसर्गिक असून पातळ केसांना घनदाट करत.
या साठी लागणारे साहित्य -मेथीदाणे 2 मोठे चमचे, एरंडेल तेल 1/2 कप 
कृती - मेथीदाण्याचे बियाणे वाळवून घ्या आणि वाटून पूड बनवून घ्या. ही पूड तेलासह मिसळून दोन ते तीन आठवडे कडक उन्हात ठेवा. आपण एरंडेल तेला ऐवजी नारळ तेल आणि ऑलिव्ह तेल देखील वापरू शकता. 
तेल इन्फ्युज करण्यासाठी आपण हे गरम करू शकता. या साठी एक सॉस पॅन घ्या. त्यामध्ये पाणी घाला.  एक वाटीत तेल आणि मेथीदाण्याची पूड घालून ती वाटी त्या गरम पाण्यात 10 ते 15 मिनिटे ठेवा. थंड करून त्या तेलाचा वापर केसांसाठी करावा.    
 
कसं वापरावं - या साठी केसांना तेल लावून 5 मिनिटे मॉलिश करून अर्ध्या तासासाठी तसेच ठेवा किंवा रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी सौम्य शॅम्पूने धुऊन घ्या. चांगला परिणाम मिळविण्यासाठी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हे वापरा. नियमित पणे लावल्यानं केसांची गळती थांबते. 
 
मेथीदाणे लावण्याचे फायदे-
केसांचे मूळ मजबूत होतात. खराब केसांची दुरुस्ती करतात. हे नैसर्गिक तेल केसांची चमक कायम ठेवतात आणि केसांना सुंदर बनवतात.  
मेथीदाण्यात केसांच्या वाढीसाठी उच्च प्रथिने आणि निकोटीन ऍसिड असत. तसेच मेथीदाण्यात हार्मोन ऍंटीसिड असतात जे केसांना पातळ होण्यापासून आणि टक्कल पडण्यापासून वाचवतात.केस घनदाट करतात.या मध्ये फॉलिक ऍसिड देखील मुबलक प्रमाणात आढळते या शिवाय या मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी,पोटॅशियम,कॅल्शियम,आयरन सारखे खनिजे असतात.हे सर्व घटक केसांना नवीन आयुष्य देत. 
आपल्याला देखील केस चांगले सुदृढ आणि घनदाट पाहिजे असल्यास मेथीदाण्याच्या तेलाचा वापर करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Gudi Padwa Special श्रीखंड पुरी रेसिपी

ताण कमी करण्यासाठी, आनंदाने प्या हा चहा

गुढीपाडव्याला कडू कडुलिंब आणि गूळ का खाल्ला जातो, जाणून घ्या त्याचे आरोग्य फायदे काय आहेत?

Facial Yoga : कोणतेही उत्पादन नाही, कोणतेही रसायन नाही, चमकदार त्वचेसाठी या नैसर्गिक उपायांचे अनुसरण करा

दररोज एक वाटी दही खाल्ल्याने आरोग्यासाठी होतात हे फायदे

पुढील लेख
Show comments