Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

अंबानींना मागे टाकत अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

Adani became the richest man in Asia
, गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (11:16 IST)
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. यापूर्वी गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर होते. ब्लूमबर्गच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी $91 अब्ज संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $88.8 अब्ज एवढी आहे.
 
गौतम अदानी यांच्या संपत्तीत वार्षिक आधारावर $ 55 अब्जने वाढ झाली आहे, तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत या कालावधीत केवळ $ 14.3 अब्जने वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर दबाव आल्याने मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट झाली आहे. मुकेश अंबानींच्या संपत्तीत घट झाल्याने सौदी अरेबियाच्या पेट्रोलियम कंपनी आरामकोसोबतचा करार रद्द केल्याची घोषणा झाल्यापासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.07 टक्क्यांनी घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2360.70 रुपयांवर व्यवहार करत आहे.
 
दुसरीकडे, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी कायम आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 2.94 टक्क्यांनी वाढून 1757.70 रुपयांवर, अदानी पोर्टचा शेअर 4.87 टक्क्यांनी वाढून 764.75 रुपयांवर होता.
 
अदानी ट्रान्समिशनचा शेअर 0.50 टक्क्यांनी वाढून 1950.75 रुपयांवर तर अदानी पॉवरचा शेअर 0.33 टक्क्यांनी वाढून 106.25 रुपयांवर होता. अदानी ग्रुपचे दोन समभाग अदानी ग्रीन आणि अदानी टोटल गॅस एक टक्का घसरत व्यवहार करत होते.
 
एप्रिल 2020 नंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. 18 मार्च 2020 रोजी त्यांची एकूण संपत्ती $4.91 अब्ज होती. गेल्या २० महिन्यांत गौतम अदानी यांच्या संपत्तीत १८०८ टक्क्यांनी वाढ झाली असून ती आता ८३.८९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाइपमधून पाण्याऐवजी पैसे आणि दागिन्यांचा पाऊस; सरकारी अधिकाऱ्याच्या घरी छापा