Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑडी Q8 भारतात लाँच विराट कोहली पहिला ग्राहक

Webdunia
शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (12:31 IST)
लक्झरी कार बनवणार्‍या जर्मन कंपनीने ऑडी Q8 भारतात लाँच केली आहे. भारतात केवळ 200 कार विकण्यात येणार असून या कारचा पहिला ग्राहक भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली बनला आहे. या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही कार 5.99 सेकंदात 100 किलोमीटरचा वेग पकडते. तसेच ताशी 250 किलोमीटर धावते.
 
ऑडीने आपल्या फ्लॅगशिप एसयूव्ही कार ट8 ला केवळ पेट्रोल इंजिनमध्ये उतरवले आहे.
 
Audi Q8 मध्ये बीएस 6 इंधन उत्सर्जन असलेला 48 व्ही माइल्ड-हायब्रिड सिस्टमसह 3 लीटर, व्ही 6 टर्बो - पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.
 
या इंजिनचे पॉवर 340 एचपी आहे. तसेच 500 एनएम टॉर्क निर्माण करते. क्यू 8 चे इंजिनमध्ये 8 स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 
 
ही ऑडी 5.9 सेकंदात शून्य ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडू शकते, असा कंपनीने दावा केला आहे. कारचा जास्तीत जास्त वेग 250 किलोमीटर प्रतितास आहे.
 
Audi Q8 SUV मध्ये 4.99 मीटर (16.4 फूट) लांबी, 2 मीटर (3.3 फूट) रुंदी आणि 1.71 मीटर (5.6 फूट) उंची आहे.
 
या कारमध्ये लगेज स्पेस जास्त दिला आहे. कारमध्ये सामान ठेवण्यासाठी 1,755 लीटर जागा दिली आहे. या कारची किंमत एक्स शो रु 1.33 कोटी रूपये इतकी आहे.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments