Festival Posters

तीन मोठ्या बँकांनी केली कर्जावरील व्याजदरात वाढ

Webdunia
शनिवार, 3 मार्च 2018 (11:10 IST)
भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयसीआयसीआय बँक या देशातील तीन मोठ्या बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे नवे कर्ज घेणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे. हे व्याजदर १ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. बँकांच्या या निर्णयामुळे गृहकर्ज महागणार असून त्यामुळे इएमआयमध्येही वाढ होणार आहे.       
 
एसबीआयने एप्रिल २०१६ नंतर पहिल्यांदाच आपल्या व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. या बँकेच्या एका वर्षाच्या कर्जावर एमसीएलआर ७.९५ टक्के इतका होता. यामध्ये ०.२० टक्के वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर सहा महिन्यांच्या कर्जावर एमसीएलआर ०.१० टक्के वाढवून ८ टक्के ठेवण्यात आला आहे. ३ वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदरांत ०.२५ टक्के वाढ करण्यात आली असून तो ८.३५ टक्के इतका करण्यात आला आहे.  एसबीआयप्रमाणेच आयसीआयसीआय आणि पीएनबी बँकेने देखील एमसीएलआरमध्ये १५ बेसिस पाँईंटने वाढ केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

अकोला : शिवसेना युबीटीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप करत सामूहिक राजीनामा दिला

LIVE: शिवसेना युबीटी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप करत सामूहिक राजीनामा दिला

दिल्लीत आयआरएस अधिकाऱ्याच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा दाबून हत्या

"त्यांच्या पापांसाठी शिक्षा मी का भोगावी?" जामीन सुनावणीदरम्यान अशोक खरातच्या पत्नीच्या वक्तव्याने खळबळ उडाली

व्हायरल व्हिडिओ वादावर गिरीश महाजन यांचे मौन सुटले; म्हणाले-"भाषा चुकीची होती, पण..."

पुढील लेख
Show comments