Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bank Holiday’s In April : जाणून घ्या यामागचे कारण आणि करा तुमचे नियोजन

Bank Holiday’s In April : जाणून घ्या यामागचे कारण आणि करा तुमचे नियोजन
मुंबई , मंगळवार, 30 मार्च 2021 (13:21 IST)
जर तुम्हाला बँकांची कामे उरकायची असतील तर लवकरात लवकर ऊरकावे लागतिल कारण तब्बल निम्मा एप्रिल महिना बँकांचे कामकाज सुट्ट्यांमुळे बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर एप्रिल महिन्यात नऊ बँक हॉलिडे आहेत. त्याशिवाय दुसरा आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी बँका बंद राहणार आहेत.
 
एप्रिलच्या पहिल्याच दिवशी बँका बंद राहणार आहेत. १ एप्रिल रोजी आर्थिक वर्ष हिशेब पूर्तीसाठी बँका बंद राहतील. तर २ एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्याने सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील.
 
सोमवार ५ एप्रिल रोजी बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त हैद्राबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बँकांना सुट्टी असेल. तर ६ एप्रिल रोजी मंगळवारी तामिळनाडूमधील विधानसभा निवडणूक मतदानाकरिता चेन्नई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बँकांना सुट्टी राहील. या दोन दिवशी देशात इतरत्र मात्र बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहील.
 
याच महिन्यात १३ एप्रिल रोजी गुढी पाडवा, तेलगू नववर्ष, उगाडी, बैसाखी निम्मित सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. १५ एप्रिल रोजी हिमाचल दिवस, बंगाली नववर्ष, बोहाग बिहू निम्मित बँक बंद राहतील. गुवाहाटी क्षेत्रात बोहाग बिहूनिमित्त १६ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी असेल.
 
एप्रिल महिन्यात शेवटची सार्वजनिक सुट्टी ही २१ एप्रिल रोजी राम नवमी निम्मित बँकांना असेल. याच दिवशी गरिया पुजा निमित्त देखील सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. याशिवाय १० एप्रिल रोजी दुसरा शनिवार, ११ एप्रिल रोजी रविवार तसेच २५ एप्रिल रोजी चौथा शनिवार आणि २६ एप्रिल रोजी रविवार बँका बंद राहणार आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होळीत रंगल्या असतील नोटा तर या प्रकारे बदला