Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

8-9 जानेवारीला व्यतिरिक्त या महिन्यात या दिवशी बँका राहणार बंद

8-9 जानेवारीला व्यतिरिक्त या महिन्यात या दिवशी बँका राहणार बंद
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात काही दिवस बँका बंद राहतील. एक नजर टाकू या जानेवारीत कोण-कोणत्या दिवस बँका बंद राहतील यावर ज्याने आपण बँकांची कामे वेळीच उरकू शकाल.
 
बँकेशी संबंधी कोणतेही काम दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार या दिवशी होऊ शकणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी 8 आणि 9 जानेवारीला संपावर राहतील. या बंदमुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार असून खूप नुकसान होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. तसेच प्रायव्हेट बँकाच्या कामावर याचा परिणाम होणार नाही.
 
युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियंस प्रमाणे विजय बँक आणि देना बँक यांचे बँक ऑफ इंडियामध्ये प्रस्तावित विलयाविरुद्ध सार्वजनिक आणि खाजगी बँकांच्या कर्मचार्‍यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी बँक अधिकारी युनियन याच मागणी आणि पगारवाढ या मुद्द्यावर चर्चा लवकर पूर्ण करण्याची मागणी करत संपावर गेले होते. आता केंद्रीय ट्रेड यूनियंसने पूर्ण देशात संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
 
यात एलआयसी आणि इतर डिपार्टमेंटचे कर्मचारी देखील सामील आहेत. 
 
या व्यतिरिक्त 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील. त्याचबरोबर महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद राहील.
 
14 जानेवारीला पोंगल, लोहरी हे सण असल्याने तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि आसाम या राज्यात बँकांना सुट्टी असेल. तसेच 16 जानेवारीला तामिळनाडूमध्ये संत तिरुवल्लूवर दिन साजरा केला जातो. यामुळे या दिवशी बँकांचे कामकाज बंद राहील.
 
23 जानेवारीला सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आसाम, पश्चिम बंगाल, उडीसा आणि त्रिपुरा या राज्यात बँका बंद राहतील. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि चौथा शनिवार एकाच दिवशी आल्याने संपूर्ण देशभरातील बँका बंद राहतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंदिरा गांधी या त्यांच्या काळातील सर्वात सक्षम नेत्या - नितीन गडकरी