कर्ज बुडवून देशातून फरार झालेल्या विजय मल्लच्या किंगफिशर एअरलाइन्सला क्षमता न पाहता भरमसाठ कर्ज देणार्या बँक अधिकार्यांचा आरोपी म्हणून आरोपपत्रात केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) समावेश करण्याची शक्यता आहे. सीबीआय मल्ल्याविरोधात महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या समूहाने दिले आहे. यामधील तब्बल 1600 कोटी रुपयांचे कर्ज एकट्या स्टेट बँकेकडून देण्यात आले. मल्ल्याला आयडीबीआय बँकेकडून देण्यात आलेल्या 900 कोटींच्या थकीत कर्जाप्रकरणी सीबीआयने यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना दोषी धरण्यात आले आहे.
बँकांच्या समूहाकडून जे कर्ज मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला देण्यात आले त्या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण झाली आहे.