Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठी बातमी! ZEE एंटरटेनमेंट, सोनी पिक्चर्सनेटवर्क्स इंडियामध्ये विलीन होण्यासाठी मंडळाने मान्यता दिली, पुनीत गोयंका कंपनीचे एमडी आणि सीईओ

Webdunia
बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (11:38 IST)
झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडच्या संचालक मंडळाने ZEEL आणि SPNI (सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया) यांच्यातील कराराला मंजुरी दिली आहे. यानंतर सोनी देखील दीर्घ गुंतवणूक करणार आहे.
 
झी एंटरटेनमेंट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया यांच्यातील विलीनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसच्या संचालक मंडळाने ZEEL आणि SPNI (सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया) यांच्यातील कराराला मंजुरी दिली आहे. या विलीनीकरणाबाबत, मंडळाचा विश्वास आहे की हे विलीनीकरण शेयरधारकांसाठी खूप चांगले सिद्ध होईल.
 
झी बिझनेसच्या मते, ZEEL ने रणनीतीणीच्या लाभाला लक्षात ठेऊन दक्षिण आशियातील एक लिडिंग मीडिया आणि मनोरंजन कंपनी विलीन केली आहे. आता हे विलीनीकरण पूर्णतः कार्यान्वित करण्यासाठी ZEEL व्यवस्थापन कार्य करेल. या कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर पुनीत गोयंका कंपनीचे एमडी आणि सीईओ म्हणून कायम राहतील. या विलीनीकरणासाठी विशेष गुंतवणूक रणनीती देखील तयार करण्यात आली आहे.
 
माहितीनुसार, या विलीनीकरणानंतर, सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट $ 1575 दशलक्ष (सुमारे 11,605 कोटी रुपये)  गुंतवणार आहे. या गुंतवणूकीची रक्कम वाढीसाठी वापरली जाईल आणि विलीनीकरणानंतर सोनी एंटरटेनमेंट बहुसंख्य शेयरधारक असेल. दोन्ही पक्षांमध्ये एक नॉन-बाइंडिंग टर्म शीटवर स्वाक्षरी झाली आहे.पुढील व्यवहार 90 दिवसात केले जातील.
 
झी एंटरटेनमेंट आणि सोनी यांच्यामध्ये या विलीनीकरणानंतर, कंपन्यांमधील भागिदारीबाबत अनेक बदल होणार आहेत. असे सांगितले जात आहे की यानंतर ZEEL च्या भागधारकांचा वाटा सध्याच्या परिस्थितीत 61.25% असेल. तर सोनीद्वारे 1575 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतर भागीदारीत बदल होईल. या गुंतवणूकीनंतर, ZEEL च्या गुंतवणूकदारांचा हिस्सा सुमारे 47.07% असेल आणि सोनी पिक्चर्सच्या भागधारकांचा हिस्सा 52.93% असण्याची शक्यता आहे.
 
ZEEL आणि SPNI दरम्यान एक विशेष नॉन-बाइंडिंग टर्म शीटवर स्वाक्षरी करण्यात आलीआहे. करारातील बाकी व्यवहार पुढील 90 दिवसात पूर्ण केले जातील. विद्यमान प्रवर्तक ZEEला आपली हिस्सेदारी 4 टक्क्यांवरून 20 टक्के करण्याचा पर्याय असेल. मंडळावरील बहुतेक संचालकांना नेमणूक करण्याचा अधिकार सोनी समूहाला असेल.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments