Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 26 April 2025
webdunia

मुंबईत सीएनजी गॅसच्या दरात कपात

CNG gas
, बुधवार, 6 मार्च 2024 (12:22 IST)
सध्या इंधन दरवाढीमुळे वाहनचालक त्रासलेले आहे. वाहनचालकांसाठी दिलासा देणारी बातमी येत आहे. महानगर गॅस लिमिटेड ने सीएनजीच्या दरात कपात केली आहे. मंगळवार 5 मार्च च्या मध्यरात्री पासून दर कमी केले आहे. अशी माहिती महानगर गॅस लिमिटेडने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली. 
 
महानगर गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मुंबईत आता सीएनजीसाठी 73.40 रुपये द्यावे लागणार आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणात सीएनजी वाहने चालतात या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.  
मात्र पीएनजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. येत्या काळात निवडणूक असल्यामुळे देशाच्या इतर भागातही सीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतात. 
 
Edited by - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

RBI देणार पैसे