Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोकरदार वर्गात निराशा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कपात

Webdunia
शुक्रवार, 6 मार्च 2020 (10:30 IST)
केंद्र सरकारचा नोकरदारांना मोठा धक्का दिला आहे. पीएफच्या व्याजदरात कपात केली आहे. यामुळे भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर आता कमी मिळणार आहे. नोकरदार वर्गासाठी ही अत्यंत निराशाजनक बातमी आहे. 
 
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात केंद्र सरकानं कपात केली आहे. दोन वर्षांनंतर पीएफवरील व्याजदरात ही कपात करण्यात आली असून व्याजदर ०.१५ टक्क्यांनी घटवण्यात आल आहे. ८.६५ टक्क्यांवरून व्याजदर ८.५०वर केला आहे. केंद्र सरकारनं नोकरदारांना धक्का दिला आहे. २०१८-१९मध्ये भविष्य निर्वाह निधीवर ८.६५ टक्के इतका व्याजदर होता. आता हा व्याजदर ८.५० टक्के इतका असणार आहे.
 
'एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन'च्या (ईपीएफओ) गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी होणार असल्याने ही व्याज कमी करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. २०२० साठी पीएफमधील ठेवींवरील व्याजदर १५ बेसिस पॉइंटनी घटवून ८.५ टक्के करण्यात आला आहे. या मुद्द्यावर 'ईपीएफओ'च्या केंद्रीय विश्वस्त समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने व्याजदर घोषित केला आहे. हा व्याजदर 8.50 % इतका आहे. यंदा व्याजदर 0.15 टक्क्याने कमी केलं आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments