Dharma Sangrah

सॅनिटायझरची किंमत वाढणार नाही, सरकारचा निर्णय

Webdunia
शुक्रवार, 20 मार्च 2020 (10:26 IST)
कोरोना व्हायरसमुळे सॅनिटायझरचा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सॅनिटायझरची मागणी भविष्यात आणखी मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक ठिकाणी साठेबाजी केली जात असल्याचे प्रकारही उघड झाले आहेत. त्यामुळे सरकारनं त्याची दखल घेत सॅनिटायझरची किंमत वाढवण्यास मज्जाव केला आहे.
 
केंद्राच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयानं सॅनिटायझरची किंमत वाढणार नाहीत असा आदेश काढला असून सॅनिटायझर स्वस्त उपलब्ध करून देण्याबाबत पावलं उचलली आहेत. देशात सॅनिटायझर ५ मार्चला ज्या किंमतीमध्ये उपलब्ध होते तीच किंमत पुढचे काही महिने कायम राहणार आहे.
 
सॅनिटायझर ५ मार्चला असलेल्या किंमतीतच ३० जूनपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काढला आहे. या आदेशामुळे लोकांना सॅनिटायझर माफक दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

नाशिक टीसीएस प्रकरण: २५ दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथे पोलिसांनी अटक केली

अशोक खरात प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, भोंदू बाबाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रात पुढील आठवड्यात १४ ते २० मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

LIVE: महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला

LIVE: महाराष्ट्रात MSRTC चे NCMC स्मार्ट कार्ड सुरू झाले

पुढील लेख
Show comments