Dharma Sangrah

इंडिका, इंडिगो चे उत्पादन बंद

Webdunia
गुरूवार, 24 मे 2018 (09:07 IST)
टाटा मोटार्सने इंडिका व इंडिगो या लोकप्रिय गाड्यांचे उत्पादन एप्रिलपासून बंद केले आहे.  टाटा मोटार्सने १९९८ मध्ये इंडिका ही ‘हॅचबॅक’ श्रेणीतील गाडी बाजारात आणली, तेव्हा तो चर्चेचा विषय होता. इंडिकाच्याच ‘सेडान’ श्रेणीतील ‘इंडिगो’ मॉडेललाही ग्राहकांनी मोठी पसंती दिली होती. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सच्या (सिआम) आकडेवारीनुसार कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात १.८७ लाख वाहनांचे उत्पादन केले. आधीच्या आर्थिक वर्षापेक्षा त्यात २२ टक्के वाढ झाली. पण त्यामध्ये इंडिका व इंडिगोच्या उत्पादनाचा आकडा अनुक्रमे २,८५३ आणि १,७५६ होता. या दोन्ही गाड्यांच्या उत्पादनात मोठी घट झाल्यानंतर त्याचे उत्पादनच थांबविण्यात आले आहे.

फेब्रुवारी महिन्यात ग्रेटर नॉयडा येथे झालेल्या आॅटो एक्स्पोमध्ये टाटा मोटार्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नेक्सॉन, हेक्सा व टिअ‍ॅगो या गाड्यांच्या पुढील आवृत्त्या लॉन्च केल्या. येत्या काळात कंपनी या गाड्यांवरच लक्ष केंद्रित करणार असून त्यासाठीच इंडिका, इंडिगोचे उत्पादन बंद करण्यात आल्याचे आॅटो क्षेत्राचे म्हणणे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

चंद्रपुरात वाघाचा थरार! तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 13 महिलांवर हल्ला; 4 जणींचा मृत्यू

LIVE: नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट

उल्हासनगर गोळीबारात दोघे ठार, एक गंभीर जखमी

नागपूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट, पुढील तीन दिवस दिलासा नाही

लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! बाजार उघडताच सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहराचे भाव तपासा

पुढील लेख
Show comments