Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इन्फोसिसने मागितली भागधारकांकडे परवानगी

Webdunia
रविवार, 3 सप्टेंबर 2017 (18:06 IST)
बंगळुरू- इन्फोसिस कंपनीतील पेच आता वेगात मिटण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. आज कंपनीच्या संचालक मंडळाने यू. बी. प्रवीण राव यांना व्यवस्थापकीय संचालक पदावर नेमण्याची परवानगी भागधारकांकडे मागतिली आहे. राव सध्या कंपनीचे हंगामी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विशाल सिक्का यांनी या पदाचा राजीनामा गेल्या पंधरावड्यात दिल्यानंतर राव यांना त्या पदावर हंगामी स्वरूपात नेमले होते. त्या अगोदर ते कंपनीत मुख्य कार्यचालन अधिकारी होते. ते काम ते आताही करीत आहेत.
 
कंपनीने म्हटले आहे की, राव हंगामी स्वरूपात व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. ते या पदावर जास्तीत जास्त पाच वर्षे किंवा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी नेमला जाईपर्यत राहतील. कंपनी आणि राव दरम्यानच्या काळात 90 दिवसांची नोटीस देऊन विभक्‍त होऊ शकतील. कंपनीने नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा शोध सुरू केला आहे. मार्च 2018 च्या आत नवा मुख्य कार्यकारी अधिकारी निवडला जाण्याची शक्‍यता आहे. भागधारकांचा याबाबतचा निर्णय 9 ऑक्‍टाबेर रोजी जाहीर केला जणार आहे.
 
सध्या कंपनीचे संस्थापक असलेले नंदन निलेकणी बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. मात्र त्यांना कसलाही पगार मिळणार नाही. ते अगोदर कपनींतून मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते तेव्हा म्हणजे 2010 मध्ये त्यांना 34 लाख रुपये पगार होता. त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबीयाकडे कंपनीचे 2.29 टक्‍के इतके शेअर आहेत. कंपनीने डी. सुंदरम या नव्या संचालकाची नियुक्‍ती केली आहे. त्यासाठी भागधारकाकडे परवानगी मागण्यात आली आहे..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री! 4 डिसेंबरला होणार घोषणा

राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा महासागर, नितीन गडकरी यांचे वक्तव्य

अंडर-19 आशिया कप: भारताने जपानचा 211 धावांनी पराभव केला

लातूर: सरकारी शाळेतील शिक्षकाची पत्नी आणि मुलीसह आत्महत्या

LIVE: देवेंद्र फडणवीस होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

पुढील लेख
Show comments