Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इक्विटी म्युच्युअल फंडात जोरदार गुंतवणूक

Webdunia
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (12:07 IST)
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ पुन्हा एकदा वाढला असून यात इक्विटी म्युच्युअल फंडांनी बाजी मारली आहे. जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 21 हजार 921 कोटींची गुंतवणूक झाली असून मागील 10 महिन्यातील ही उच्चांकी गुंतवणूक आहे. 
 
म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संघटना असलेल्या 'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया'ने (एएमएफआय)जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात एकूण 21 हजार 921 कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यापैकी 8 हजार 532 कोटींची गुंतवणूक  'एसआयपी'च्या माध्यमातून झाली.
 
'एसआयपी'ला गुंतवणूकदार चांगला प्रतिसाद देत असलचे 'एएमएफआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस वेंकटेश यांनी सांगितले. इक्विटी म्युच्युअल फंडांतील ' डीव्हीडंड यिल्ड फंड' आणि 'व्हॅल्यू फंड' या दोन योजनांची कामगिरी वगळता इतर योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन्ही योजनांमधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे. 'एसआयपी'तील गुंतवणुकीने 3 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यात जानेवारी महिन्यात 7 हजार 846 कोटींची भर पडली. एसआयपीत 3 लाख 35 हजारकोटींची मालमत्ता आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

विनोद तावडे यांनी राहुल-खर्गे यांच्या विरोधात कोर्टाची नोटीस बजावली

Hockey:भारतीयमहिला संघाने चीनचा पराभव केला, सामना1-0 ने जिंकला

लग्नाच्या मंचावर हृदयविकाराच्या झटक्याने मित्राचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा डेव्हिस कप उपांत्य फेरी गाठली

ठाणे जिल्ह्यात तीन वर्षांच्या भाचीच्या हत्येप्रकरणी मामाला अटक

पुढील लेख
Show comments