Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करदात्यांना मोठा दिलासा, ITR दाखल करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली

Webdunia
गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (23:24 IST)
ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (CBDT) ने त्या करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे ज्यांनी अद्याप आयकर विवरणपत्र भरले नाही. सीबीडीटीने म्हटले आहे की, मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. "मूल्यांकन वर्ष 2021-2022 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै पूर्वी होती. ती आधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे," असे मंत्रालयाने म्हटले आहे. याचा अर्थ आता तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत ITR भरू शकता.
 
पोर्टलमध्ये समस्या येत होती: हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा करदात्यांना नवीन आयटीआर पोर्टलवर आयटीआर दाखल करण्यात अडचण येत आहे. अलीकडेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पोर्टलमधील त्रुटी दूर करण्यासाठी इन्फोसिसला 15 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला. वास्तविक, हे पोर्टल इन्फोसिसनेच बनवले आहे.
 
 
67,400 कोटी रुपये परतावा: दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत आयकर विभागाने 67 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर परतावा जारी केला आहे. अलीकडेच, आयकर विभागाने म्हटले होते की 1 एप्रिल 2021 ते 30 ऑगस्ट 2021 दरम्यान 23.99 लाख करदात्यांना 67,401 कोटी रुपयांचे कर परतावे जारी करण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Mahrashtra Exit Polls : महाराष्ट्रात महायुती की एमव्हीए? एक्झिट पोलनंतर गोंधळ वाढला

Balasaheb Shinde Died: बीडचे उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Exit Poll Result 2024: झारखंडमध्ये कोणाचे सरकार, एक्झिट पोल काय सांगतात?

Exit Poll 2024 महाराष्ट्रात सरकार कोण बनवणार, एक्झिट पोल काय सांगतात?

LIVE: महाराष्ट्रात मतदान पूर्ण झाले

पुढील लेख
Show comments