Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन बलात्कार, नराधमाला अटक

Webdunia
गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (22:07 IST)
पुणे स्टेशन परिसरातील एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कार झाला आहे. पुण्यातील ३९ वर्षाच्या रिक्षा चालकाने या ६ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केला. या नराधम रिक्षा चालकाला बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्याच्याकडेला आईच्या शेजारी झोपलेल्या या चिमुकलीला रात्री नराधम रिक्षा चालकाने उचलून नेले. त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथवर आईच्या शेजारी झोपलेल्या ६ वर्षीय चिमुकलीला रात्री १ च्या सुमारास रिक्षा चालकाने उचलून नेले. त्यानंतर तिला रिक्षात घालून मार्केट यार्ड परिसरात नेण्यात आले. तिथे नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यादरम्यान चिमुकलीच्या आईला जाग आली असता तिच्या शेजारी झोपलेली मुलगी गायब असल्याचे दिसली. यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठत यासंदर्भातील तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ या मुलीचा शोध सुरु केला. यावेळी सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी मार्केट यार्ड परिसरात दिसला. त्यानंतर पोलिसांनी मार्केट यार्ड गाठत आरोपीला शोधून त्याला अटक केली. सध्या या अल्पवयीन मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

ममता कुलकर्णी महामंडलेश्वर झाल्यामुळे बाबा रामदेव संतापले! दिली ही प्रतिक्रिया

ठाण्यात 81 शाळा बेकायदेशीर, शाळा बंद न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा

नाशिकात बेकायदेशीर बांगलादेशींना बनावट जन्म दाखले देणारे 2 अधिकारी निलंबित

LIVE: स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे वाढली

स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी

पुढील लेख
Show comments