Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LIC पॉलिसी असेल तर लवकर करा हे काम, नाही तर अडकू शकतो पैसा...

Webdunia
आपल्याकडे भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) पॉलिसी आहे आणि मॅच्योर होणार असेल तर लगेच आपलं बँक खाते पॉलिसीशी लिंक करवण्याची गरज आहे. जर खाते लिंक केले गेले नाही तर आपला पैसा अडकू शकतो. भारतीय जीवन विमा निगम आतापर्यंत चेकद्वारे पॉलिसी भुगतान करण्यात येत होतं परंतू आता पैसा थेट बँक खात्यात ट्रांसफर केला जाईल. यामुळे पॉलिसीला बँक खात्याशी लिंक करवण्याची गरज आहे. 1 मार्च 2019 आधीच पॉलिसीला बँक खात्याने लिंक आणि मोबाइल नंबर रजिस्टर करवून घेणे योग्य ठरेल.
 
भारतीय जीवन विमा निगमने आपल्या पॉलिसी होल्डर्सला सूचित करणे सुरू केले आहे. या व्यतिरिक्त एलआयसी आपल्या सर्व सेवा आता डिजीटल करू पाहत आहे. 1 मार्च 2019 पासून प्रत्येक ग्राहकाला ऑटोमेटेड एसएमएस द्वारे पॉलिसी प्रीमियम, पॉलिसी मॅच्योरिटी, पॉलिसी होल्ड सारख्या माहिती पुरवण्यात येतील.
 
या प्रकारे करू शकता मोबाइल नंबर रजिस्टर
मोबाइल नंबर रजिस्टर करवण्यासाठी आपण एजंटला कॉल करू शकता आणि आपण एलआयसीच्या वेबसाइटवर www.licindia.in/Customer-Services/Help-Us-To-Serve-You-Better जाऊन किंवा हेल्पलाइन नंबर 022-68276827 वर कॉल करून रजिस्टर करवू शकता. यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही.
 
बँकला लिंक करवा पॉलिसी 
एलआयसीने काही दिवसांपूर्वीच पॉलिसीला बँक खात्यांशी लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पॉलिसी मॅच्योर झाल्यावर ग्राहकांचा पैसा सरळ खात्यात ट्रांसफर केला जातो म्हणून प्रत्येक ग्राहकांना पॉलिसी बँक खात्यासोबत लिंक करणे आवश्यक आहे.
 
एलआयसीनुसार आतापर्यंत अनेक पॉलिसी धारकांनी खाते लिंक करवले नाही त्यामुळे अशा ग्राहकांचा पैसा अडकलेला आहे. आपली पॉलिसी बँक खात्याशी लिंक आपल्याला कँसिल चेक किंवा पासबुकच्या फ्रंट पेजची कॉपी एलआयसी ब्रांचमध्ये जमा करवावी लागेल.
 
सोबतच NEFT मँडेट फॉर्म भरवा लागेल. फॉर्म आणि आपल्या बँक खात्याची माहिती जमा केल्यानंतर आपली पॉलिसी एका आठवड्यात बँक खात्याशी जुळेल. पॉलिसी मॅच्योर झाल्यावर एलआयसी थेट आपल्या खात्यात पैसा ट्रांसफर करेल.

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments