Marathi Biodata Maker

LPG Price: व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी

Webdunia
सोमवार, 1 एप्रिल 2024 (11:16 IST)
तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडर आणि पाच किलोच्या एफटीएल (फ्री ट्रेड एलपीजी) सिलेंडरच्या किमती कमी केल्या आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 30.50 रुपयांनी कमी झाली आहे. 1 एप्रिलपासून दिल्लीत त्याची किंमत 1764.50 रुपये असेल. पाच किलो एफटीएलची किंमत आता 7.50 रुपयांनी कमी झाली आहे.

गॅस सिलेडरच्या किंमत कपातीनंतर आता कोलकात्यात सिलेंडर 1879 रुपये आहे. पूर्वी ही किंमत 1911 रुपये होती. गॅस सिलेंडर स्वस्तर झाल्यानंतर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1717.50 रुपये झाली आहे, जी किंमत आधी1749 रुपये होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेडर आता 1930 रुपयांना मिळणार आहे.
 
1 मार्च रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत 1795 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या मेट्रो शहरांमध्ये इंडेन गॅस सिलिंडरच्या किमती वेगळ्या होत्या. 1 मार्चपासून सर्व मेट्रो शहरांमध्ये इंडेन गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. .घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र  कोणताही बदल झालेला (LPG Gas Cylinder) नाही.
 
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) दर महिन्याच्या 1 तारखेला LPG च्या किमती बदलतात. इंधनाची किंमत आणि बाजाराच्या परिस्थितीनुसार किंमतींमध्ये चढ-उतार होतात.

Edited by - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

शेतकरी कर्जमाफी वर सरकार 1 जुलै पर्यंत योजना जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेडगेवार स्मारक मंदिरात पोहोचले, अजित पवारांनी अंतर ठेवले

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर गोळीबार,अनेकांचा मृत्यू, दोघांना अटक

पुढील लेख
Show comments