Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माधबी पुरी बुच : SEBI चं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ते 'हिंडनबर्ग'च्या रिपोर्टमध्ये नाव, जाणून घ्या संपूर्ण प्रवास

Webdunia
बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (16:14 IST)
अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडनबर्गने बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्यावर रविवारी (11 ऑगस्ट) रात्री पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत.हिंडनबर्गने त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर कागदपत्रांसह एक पोस्ट करत काही दावेही केले आहेत.
 
हिंडनबर्ग रिसर्चने माधबी यांचे विधान असलेल्या ट्विटला रिट्वीट करत लिहिले, “आमच्या रिपोर्टवर सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच यांच्या प्रतिक्रियेतून अनेक महत्वाच्या गोष्टी स मोर आल्या आहेत. तसेच अनेक महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित झाले आहेत.”
 
हिंडनबर्ग रिसर्चकडून सांगण्यात आलं की, माधबी बुच यांच्या प्रतिसादातून त्यांची बर्म्युडा/मॉरिशस येथील फंडात भागीदारी असल्याचं स्पष्ट होतं. तो पैसा विनोद अदानी यांनी वापरला होता. त्यांनी (माधबी) पुष्टी केली आहे की, तो निधी त्यांच्या पतीच्या बालमित्राने वापरला होता आणि तेव्हा ते अदानीचे संचालक होते.
रविवारी संध्याकाळी सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी हिंडनबर्ग रिसर्चच्या दाव्यांवर प्रतिक्रिया देणारे दोन पानांचे निवेदन जाहीर केले.
 
'अहवालात नमूद केलेला निधी 2015 मध्ये गुंतवला गेला होता आणि माधबी सेबीच्या सदस्य होण्याच्या दोन वर्ष आधीचं हे प्रकरण आहे', असं त्यांनी सांगितलं होतं.
याआधी अमेरिकेच्या ‘हिंडनबर्ग’ने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केलाय की, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेशी संबंधित असलेल्या ऑफशोअर कंपन्यांमध्ये भागीदारी आहे.
 
हिंडनबर्गने व्हिसलब्लोअरच्या कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला आहे. बीबीसीने या कागदपत्रांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.
 
कोण आहेत माधबी पुरी बुच?
माधबी पुरी बुच यांनी आयआयएम अहमदाबाद येथून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून गणित विषयात पदवी घेतली आहे.
सेबीच्या वेबसाइटनुसार, माधबी पुरी बुच 2 मार्च 2022 पासून सेबीच्या अध्यक्षा आहेत.
माधबी पुरी यांनी 4 ऑक्टोबर 2021 पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्या म्हणून काम केले.
या काळात माधबी यांच्याकडे बाजार नियमन विभाग, बाजार मध्यस्थ नियमन आणि पर्यवेक्षण विभागाची जबाबदारी होती.
 
पूर्णवेळ सदस्य म्हणून, माधबी यांनी एकात्मिक देखरेख विभाग, गुंतवणूक व्यवस्थापन विभागासारखे अनेक महत्त्वाचे विभाग सांभाळले आहेत.
 
माधबी यांनी कोणत्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत?
माधबी बुच यांनी शांघाय येथील 'न्यू डेव्हलपमेंट बँके'त सल्लागार म्हणूनही काम केलं आहे.
माधबी बुच यांनी 'ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल' या खासगी इक्विटी फर्मच्या सिंगापूर कार्यालयाच्या प्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे.
सेबीच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर माधबी पुरी बुच यांनी आयआयएम अहमदाबादच्या दीक्षांत समारंभात म्हटलं होतं की, “गेल्या 35 वर्षांचा काळ मी खूप एन्जॉय केला. मला विविध कामं करण्याची संधी मिळाली, मी नवीन व्यवसाय उभे केले.
 
“मी कधीच पराभव मानत नाही. माझे सहकारी बरेचदा म्हणतात की, माझ्यासोबत मिळून एखादी समस्या सोडवणे म्हणजे कांदा सोलण्यासारखे आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. पण, शेवटी समस्येचं समाधानही होते.”
 
माधबी पुरी यांची कारकीर्द
इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सनुसार, 1966 साली जन्मलेल्या माधबी यांचं बालपण मुंबईत गेलं. त्यांचं शालेय शिक्षणही मुंबईतूनच झालंय.
फायनान्स क्षेत्रात त्यांचा प्रवास 1989 साली सुरू झाला. आयसीआयसीआय बँकेपासून त्यांचं काम सुरू झालं.
आयसीआयसीआयच्या कार्यकाळात माधबी बुच यांनी गुंतवणूक बँकिंगपासून विपणन ते उत्पादन विकासापर्यंत अनेक भूमिका पार पाडल्या.
2009 साली आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बनणाऱ्या पहिल्या महिला म्हणून निवड झाल्यावर त्यांच्या नेतृत्वगुणांची चुणूक दिसून आली.
 
माधबी यांच्या नेतृत्वात 'आयसीआयसीआय सिक्युरिटीज'ने मोठे यश संपादन केले. ज्यामध्ये बाजारातील शेअरमध्ये वाढ आणि नवीन गुंतवणूक उत्पादने लागू करणं समाविष्ट होतं. नेतृत्वाबाबतचा त्यांचा दृष्टीकोन हा जोखीम व्यवस्थापन आणि कार्यक्षमतेवर केंद्रित होता.
आयसीआयसीआयमधून बाहेर पडल्यानंतर बुच यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाचा विस्तार केला. त्यांनी शांघायमधील 'न्यू डेव्हलपमेंट बँके'त सल्लागार म्हणून काम केले आणि एका खासगी इक्विटी फर्म 'ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल'च्या सिंगापूर कार्यालयाचं कामकाज सांभाळलं.
 
भारतात परतल्यावर, बुच यांनी 'आयडिया सेल्युलर लिमिटेड' आणि 'एनआयआयटी लिमिटेड'सह अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर बिगर कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले.
 
या अनुभवांमुळे त्यांना 2017 मध्ये सेबीच्या पूर्णवेळ सदस्य (WTM) होण्यास मदत झाली. तिथे त्यांनी देखरेख आणि म्युच्युअल फंडासारखे प्रमुख पोर्टफोलिओचं व्यवस्थापन केलं.
 
सेबीचं नेतृत्व करणारी पहिली महिला
इकॉनॉमिक टाईम्सनुसार, सेबीचे तत्कालीन अध्यक्ष अजय त्यागी यांच्याशी चांगला समन्वय आणि सहकार्यामुळे माधबी यांचा प्रभाव आणखी ठळक झाला.
 
मार्च 2022 मध्ये, माधबी बुच या सेबीचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
 
वृत्तपत्रानुसार, सेबीतील त्यांचे नेतृत्व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स (NISM) चा विस्तार करण्यात आणि भारताच्या वित्तीय बाजारांचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक सुधारणांचा पाठपुरावा करण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे.
 
माधबीचे पती धवल बुच यांची कारकीर्दही विशेष आहे. असे असले तरी ते सार्वजनिकरित्या चर्चेपासून लांब राहिले.
 
माधबीप्रमाणेच, त्यांचा व्यावसायिक प्रवासही कॉर्पोरेट जगतात लक्षणीय कामगिरीमुळे नावाजलेला आहे . मात्र, हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाशी संबंधित केलेल्या आरोपानंतर ते चर्चेत आले.
बिझनेस स्टँडर्ड या इंग्रजी वृत्तपत्रानुसार धवल बुच हे आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत.
धवल हे प्रायव्हेट इक्विटी (PE) प्रमुख 'ब्लॅकस्टोन आणि सल्लागार कंपनी' 'अल्वारेझ अँड मार्सल'चे वरिष्ठ सल्लागार आहेत. ते गिल्डन या स्पोर्ट्सवेअर ब्रँडचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर देखील आहेत.
 
त्यांच्या कॉर्पोरेट कारकिर्दीला तीन दशकांहून अधिकचा काळ लोटलाय.
2013 साली, धवल आणि माधबी यांनी सिंगापूरमध्ये 'अगोरा ॲडव्हायझरी' या वित्तीय सेवा सल्लागाराची स्थापना केली होती. इनक्युबेशन, गुंतवणूक आणि मार्गदर्शन याद्वारे प्रभावी व्यवसायांना पाठिंबा देणे हे त्याचे उद्दिष्ट होते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना

जयपूर अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 30 जणांची प्रकृती गंभीर

LIVE: बीड हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केले

'मुंबई आधी महाराष्ट्राची, मग भारताची' म्हणाले आदित्य ठाकरे

नागपूरमध्ये दुहेरी हत्याकांड: वैमनस्यातून 5 आरोपींनी मिळून पिता-पुत्राची हत्या केली

पुढील लेख
Show comments