Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पतंजली उद्योगसमुहाकडून मिहानमध्ये महिनाभरात उत्पादनास प्रारंभ होणार

Webdunia
बुधवार, 2 मार्च 2022 (07:37 IST)
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची नागपुरच्या मिहान भेट फलदायी ठरली आहे .पतंजली उद्योग समूहाने मिहानमधील आपल्या प्रकल्पात पुढील तीन आठवड्यात प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करण्याचे आश्वासन  कपूर यांना दिले आहे.
दीपक कपूर यांनी वेगवेगळ्या बैठकांमध्ये विविध कंपन्या, व्यापारी संघटना व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.नागपूरसह विदर्भासाठी ग्रोथ इंजिन ठरत असलेल्या मिहान प्रकल्पाला गतिशील करण्यासाठी सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा. अडचणी विना तोडगा ठेवू नका, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी कपूर यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी, मिहान इंडिया लिमिटेडचे अधिकारी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे अधिकारी, विविध शिष्टमंडळासोबत स्वतंत्ररित्या विस्तृत बैठका घेतल्या. मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन आणि मिहानच्या विविध वेंडर यांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतले.तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले.
स्टार हॉटेल प्रकल्पासाठी 6.79 एकर जमीन घेतलेल्या गुंतवणूकदाराशीही त्यांनी चर्चा केली. सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून लवकरच बांधकाम सुरू करण्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या भेटीत त्यांनी नागपूरसाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या 234 एकर विस्तीर्ण जागेत तयार होत असलेल्या पतंजली उद्योग समुहासोबतही चर्चा केली.पतंजली फुड अँड हर्बल पार्कचे महाव्यवस्थापक डी. जी. राणे यांच्याशी त्यांची चर्चा झाली. पतंजली फूड पार्कमध्ये फ्लोअर मिल सुरू करण्याचे काम पूर्णत्वास आले असल्याची माहिती श्री. राणे यांनी दिली. सर्व मशिनरी पोहचल्या आहेत. अंतर्गत रस्ते बांधणीचे कामही जोरात सुरू आहे. फॅक्टरी हँगरमध्ये प्लास्टरिंगचे काम पूर्णत्वास आले आहे, फ्लोअरिंग आणि पेंटिंगचे काम लवकरच सुरू होईल आणि 2-3 आठवड्यांत, महिनाभरात उत्पादन सुरू होईल,असे त्यांनी सांगितले.
मिहान प्रकल्पातील इतर पायाभूत सुविधांच्या विकास कामांचा आणि इतर विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेतला. श्री कपूर यांनी मिहान प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबत बैठक घेतली. त्यांनी सावरकरांना आश्वासन दिले की, मिहान प्रकल्प बाधित खापरी गावातील प्रकल्पग्रस्तांसाठी वाढीव भरपाई आणण्यासाठी विमानतळ विकास कंपनी आवश्यक ती कार्यवाही करेल.
अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी गेल्या 2 वर्षात कोविड महामारीचा आव्हानात्मक टप्पा असूनही, मिहानने निर्यातीत भरीव वाढ केल्याबद्दल कौतुक केले. आरोग्य, विमान वाहतूक, फार्मास्युटिकल्स, ऍग्रो, आयटी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काही नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. अनेकांसोबत बोलणी सुरू आहे. लवकरच यामध्ये यश येईल व वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला

LIVE: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

जानेवारीत मिळू शकते मोठी भेट, 8व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार

RBI गव्हर्नर रुग्णालयात दाखल, चेन्नईमध्ये उपचार सुरू

पुढील लेख
Show comments