Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील 'या' बँकेवर RBI कडून निर्बंध, फक्त 10,000 काढता येणार

महाराष्ट्रातील 'या' बँकेवर RBI कडून निर्बंध, फक्त 10,000 काढता येणार
, गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (14:51 IST)
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील मलकापूर नागरी सहकारी बँकेच्या ग्राहकांवर विविध निर्बंध लादले आहेत. झर्व्ह बँकेने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. 
 
या सहकारी बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले असून आता मलकापूर नागरी सहकारी बँक कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करणार नाही. कोणतीही गुंतवणूक करणार नाही. कोणतेही दायित्व घेणार नाही आणि आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही पेमेंट करणार नाही.
 
ग्राहकांना खात्यातून फक्त 10,000 काढता येणार
मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना आता खात्यातून 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, असे आरबीआयने म्हटलेय. बचत आणि चालू खाते अशा दोन्ही ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 
 
निर्बंध 24 नोव्हेंबरपासून सहा महिन्याकरिता लागू
नवे निर्बंध 24 नोव्हेंबरपासून सहा महिन्याकरिता लागू राहतील. सहकारी बँकांना सूचना जारी करणे म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये, अस आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील.
 
या दोन कंपन्यांवरही कारवाई
यासोबत रिझर्व्ह बँकेनं रेग्युलेशनशी निगडित नियमाचं पालन न केल्यामुळे टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड आणि एपनिट टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली. या दोन कंपन्यांवर आरबीआयने दंड ठोठावल्याची बातमी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tomato Price Hike : हिवाळ्यात स्वस्त असणारे टोमॅटो शंभरी पार का करत आहेत?