Dharma Sangrah

रिलायन्स जिओचा 3 हजार कोटींचा नफा, फक्त अडीच वर्षांत 30 कोटी ग्राहकांची संख्या ओलांडली

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2019 (17:15 IST)
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने 2018-19 मध्ये 2,964 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे युनिट रिलायन्स जिओने सुमारे अडीच वर्षांपूर्वीच देशातील दूरसंचार क्षेत्रात पाऊल टाकले होते आणि फक्त 30 महिन्यात 30 कोटी ग्राहकांची संख्या ओलांडली आहे.
 
गुरुवारी कंपनीच्या घोषित परिणामानुसार गेल्या 31 मार्च रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात त्यांना 15,102 कोटी रुपयांच्या कर पूर्वी नफा झाला आहे. 1 वर्षा पूर्वीच्या तुलनेत सव्वा दोन वेळा जास्त होते. ऑपरेटिंग मार्जिन 38.9 टक्के राहिली. संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत रिलायन्स जिओचा कर पूर्वीचा नफा 4,053 कोटी रुपये होता, आणि जे तिसऱ्या तिमाहीत 13.4 टक्के जास्त आहे. 
 
कंपनीच्या इतर व्यवसायात देखील अंबानीने मजबूत वाढीसाठी अभिनंदन करताना म्हणाले की मला रिलायन्स संघाचा अभिमान आहे. या यशात रिलायन्स संघाचा कठोर परिश्रम आणि समर्पण आहे. रिलायन्स जिओचा 2018-19 मध्ये प्रति ग्राहक महसूल (एआरपीयू) 126.2 रु राहिलं आहे. चवथ्या तिमाहीत जिओ ग्राहकांनी सरासरी दरमहा 10.9 जीबी डेटा वापरला आणि 823 मिनिटे व्हॉईस कॉल केली. तसेच याच तिमाहीत 2.7 कोटी ग्राहक कंपनीशी जुळले. या काळात ग्राहकांनी 956 कोटी जीबी वायरलेस डेटा वापरला आणि एकूण 72,414 कोटी मिनिटे गोष्टी केल्या. 
 
त्याचवेळी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय) च्या ताज्या आकडेवारीनुसार वायरलेस ग्राहकांच्या बाजारात जिओचा भाग फेब्रुवारीच्या अखेरीस 25.11 टक्के झाले. या महिन्याच्या दरम्यान कंपनीने 77,93,440 ग्राहक जोडले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बिहारचे पहिले मुख्यमंत्री कोण होणार? पाटणा येथे होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत होणार निवड

SRH vs RR: राजस्थान रॉयल्सवर सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार

अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी सुरू केली, ट्रम्प यांनी इराणी जहाजे नष्ट करण्याची धमकी दिली

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

पुढील लेख
Show comments