Marathi Biodata Maker

घरच्यांनी ठरवले दोषी, पण प्रेक्षकांमध्ये ठरली हिट

Webdunia
मंगळवार, 11 जून 2019 (11:07 IST)
'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेद्वारे सर्व घराघरात पोहोचलेली विना जगताप बिग बॉस मराठी सीजन २ च्या घरात गेल्या आठवड्यात चर्चेचा विषय ठरली. विद्याधर जोशी, शिवानी सुर्वे आणि वैशाली म्हाडे यांच्यासोबत झालेल्या तिच्या वादाबरोबरच रुपाली भोसले, किशोर शहाणे, पराग कान्हेरे आणि शिव ठाकरे यांसोबतच्या तिच्या मैत्रीचे किस्से देखील गाजले. मात्र, त्याहून जास्त चोर-पोलीस टास्कदरम्यान शिवानी आणि विणामध्ये वाजलेलं 'लाथ' प्रकरण जरा अधिकच वाजलं. इतकेच नव्हे तर त्यावरून बिग बॉसच्या घरात खटलादेखील चालला. मात्र, आपली बाजू सत्य असूनही घरच्या सदस्यांच्या पक्षपातीपणामुळे वीणाला अपराधी घोषित करण्यात आले. शिवाय विकेंड च्या डावात घरच्या सदस्यांचे बहुमत न मिळाल्यामुळे वीणाच्या डोक्यावर बर्फाचे थंड पाणी ओतले गेले. अश्याप्रकारे प्रत्येक शिक्षेला खिलाडूवृत्तीने सामोरे गेलेल्या वीणाने तसूभरदेखील केमेऱ्यासमोर येऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र तिचे प्रतिस्पर्धी सतत केमेऱ्यासमोर येऊन स्वतःचा खरेपणा सिद्ध करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसून आले. वीणाच्या याच संयमी वृत्तीवर खुश होऊन, तिच्या चाहत्यांनी तिला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे. वीणासाठी बिग बॉसच्या घरातला हा दुसरा आठवडा 'कभी ख़ुशी कभी गम' असा जरी ठरला असला, तरी घराबाहेर ती सुपरहिट ठरली आहे. शिवानी आणि विणाच्या भांडणांला दोघे समान कारणीभूत असूनही शिक्षा मात्र वीणाला मिळणे हे पूर्णपणे पक्षपातीपणाचे लक्षण असल्याचे तिच्या चाहत्यांकडून सांगितले जात आहे. शिवाय,अडगळीच्या खोलीत जाण्याची शिक्षा मान्य करूनदेखील, त्यानंतरच्या खटल्यात आणि 'विकेंड चा डाव' मध्ये वीणावरच दोषी असल्याचा शिक्का बसावा, हे कितपत योग्य आहे? असादेखील प्रश्न वीणाचे हितचिंतक विचारू लागले आहेत.
वीणाने आतापर्यंत आपला संयम कायम राखत, पदोपदी आपली प्रामाणिकता आपल्या वागण्यांतून स्पष्ट केली आहे. त्यामुळे ती आपल्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी होऊ शकते या भीतीने घरातील सदस्य तिच्या विरोधात पाऊले उचलत आहे. याचीच प्रचिती शनिवार आणि रवीवारच्या भागात दिसून आली. असे असले तरी, घराबाहेरील सुज्ञ प्रेक्षकांनी सोशल नेटवर्किंग साईटद्वारे भरभरून मत देत तिला सेफ केले. थोडक्यात काय तर, घरच्यांचे सर्वाधिक मते जरी वीणाला मिळाले नसले तरी प्रेक्षकांच्या बहुमताने तिला वाचवले !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज

भाजप नेत्याच्या विधानावर रितेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली

Doctor Patient Joke स्वर्गवासी

अनिल कपूर २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत, 'नायक'चा सिक्वेल निश्चित

Kasheli Beach कोकणातील ऑफबीट व्हिलेज टुरिझम: कशेळी गाव

पुढील लेख
Show comments