Dharma Sangrah

'बिग बॉस'च्या चावडीवर गायत्रीने सोनालीला सुनावले खडेबोल

Webdunia
बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (20:23 IST)
मराठी 'बिग बॉस ३'च्या घरातील खेळाची रंगत आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 'बिग बॉस'कडूनही आता वेगवेगळे टास्क दिले जात आहेत. ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाची चढाओढ सुरु आहे आणि या दरम्यान अनेक जण एकमेकांवर टीका करत आहेत. अशीच टीका सोनाली पाटीलने गायत्री दातारच्या हसण्यावर केली आहे.

मुळात गायत्री शांत आणि विनम्र स्वभावाची आहे. परंतु 'बिग बॉस'च्या चावडीवर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर गायत्रीने ठामपणे आपले मत मांडले आहे. सोनाली पाटीलच्या या नकारात्मक टीकेवर गायत्रीने तिला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. गायत्री दातारच्या हसण्यावर आणि तिच्या गालावर पडणाऱ्या खळीचे असंख्य चाहते आहेत आणि असे असताना सकारात्मक बाबीवर टीका करणे कितपत योग्य आहे, असा थेट प्रश्न गायत्रीने सोनालीला विचारला. एखाद्याच्या दिसण्यावर, रंगरूपावर, अथवा अवयवावर वक्तव्य करणेच मुळात चुकीचे आहे आणि हाच मुद्दा धरून गायत्रीने सोनालीची चांगलीच शाळा घेतली तीही 'बिग बॉस'समोर. एरव्ही शांत स्वभावाची गायत्री प्रसंगी ठामपणे उभी राहू शकते, हे तिच्या या कृतीतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता बिग बॅास’च्या घरात टक्कर द्यायला गायत्री सज्ज झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली! कर्करोगानंतर तिला नवीन सिस्ट आढळला

कार्तिक आर्यन-अनन्या पांडेचा 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज

Top Five Tourist Destinations वयाच्या ५० व्या वर्षापूर्वी या ५ अद्भुत ठिकाणी नक्कीच भेट द्या...

"सुबेदार" चित्रपटाच्या ट्रेलरने अनुपम खेर यांचे मन जिंकले; अनिल कपूर यांचे कौतुक केले

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

पुढील लेख
Show comments