Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मी वसंतराव’पाहून पुढील २० वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली - डॉ. रघुनाथ माशेलकर

Webdunia
मंगळवार, 19 एप्रिल 2022 (15:58 IST)
रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करणारा 'मी वसंतराव' या चित्रपटाची अद्यापही चित्रपटगृहात यशस्वी घोडदौड सुरु आहे. प्रेक्षक, समीक्षकांपासून सिनेसृष्टीतील कलावंतांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटावर कौतुकांचा वर्षाव केला. एका ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा पाहून प्रत्येकालाच जगण्याची वेगळी ऊर्जा देणारा हा चित्रपट आहे.  
 
'मी वसंतराव' अनेक दिग्गजांच्या पसंतीस उतरत असतानाच पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे देखील चित्रपट पाहून भारावून गेले.
 
‘वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल मला फार आदर आहे. राहुल मध्ये वसंतराव आहेत हे आज मला या चित्रपटातून जाणवलं. हा चित्रपट पाहताना प्रत्येक टप्प्यावर नवीन पैलू उलगडत जातातं. चित्रपटाची निर्मिती, मांडणी इतकी सुंदर आहे की चित्रपट पाहताना माझ्या डोळ्यात चक्क पाणी होतं. 'मी वसंतराव'ने मला पुढील वीस वर्षांसाठी काम करण्याची ऊर्जा दिली आहे.’अशी प्रतिक्रिया डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे.
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' हा काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

माझी बायको हरवलीय...

मी सांगून सांगून थकले !

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

भारतातील चार प्रसिद्ध स्कुबा डायव्हिंग स्थळे

पुढील लेख
Show comments