Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘सत्यशोधक’मध्ये संदीप कुलकर्णी साकारतोय ज्योतिबा

‘सत्यशोधक’मध्ये संदीप कुलकर्णी साकारतोय ज्योतिबा
, सोमवार, 19 एप्रिल 2021 (14:58 IST)
चित्रपटांमध्ये ऐतिहासिक चित्रपटांचा जुन्या काळापासून सध्याच्या काळापर्यंत बोलबाला आहे. बॉलिवूडमध्येही ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमा करतात. या चित्रपटातून चांगला आदर्श निर्माण केला जातो. महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा जेतिबा फुले यांनी समाज परिवर्तनासाठी सत्यशोधक समितीची स्थापना केली होती. समाजलेखक, विचारवंत आणि थोर समाजसुधारक महात्मा जेतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
 
‘सत्यत्शोधक' असे या आगामी चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटामध्ये ज्योतिबांची भूमिका संदीप कुलकर्णी साकारतो, तर राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारत आहे. क्रांतिकारी महात्मा फुलेंची जीवनयात्रा ‘सत्यशोधक' या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. मोठ्या पडद्यावर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये सुहाना खानचे ग्लॅमरस स्टाईल, फ्रेंडसोबत फोटो शेअर केले