Marathi Biodata Maker

उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची अशी ही मकरसंक्रांत !

Webdunia
शुक्रवार, 12 जानेवारी 2018 (12:20 IST)
छोट्या पडद्यावरील जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान आणि मराठी चित्रपटश्रुष्टीतील गुणी अभिनेता उमेश कामत यांनी नुकताच मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. झेलू एंटरटेनमेन्टस निर्मित 'असेही एकदा व्हावे' या सिनेमाच्या निमित्ताने हि जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येत असून, दादर येथील प्लाझा सिनेमागृहात नुकतीच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. दरम्यान या सिनेमाचा टीझर मोशन पोस्टरदेखील प्रदर्शित करण्यात आला. मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या कार्यक्रमात उमेश आणि तेजश्रीने उपस्थितांना तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या. शिवाय पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंददेखील लुटला.
सुश्रुत भागवत दिग्दर्शित या सिनेमाची श्री मधुकर रहाणे यांनी निर्मिती केली आहे. त्यांना याकरिता त्यांचे मित्र श्री रविंद्र शिंगणें यांचें बहुमूल्य सहकार्य लाभले. नुकताच प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या टीझर मोशन पोस्टरवरून हा एक रोमँटिक चित्रपट असल्याचा अंदाज येतो, तूर्तास सिनेमाबाबतची एवढीच माहिती बाहेर आली असून, अभिनेत्री शर्वाणी पिल्लईचीदेखील यात महत्वाची भूमिका आहे. प्रेमाची नवी परिभाषा मांडणारा हा सिनेमा येत्या ६ एप्रिल 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने बाथरूममधील बोल्ड फोटो शेअर केले, आरशासमोर Curvy Figure दाखवताना

'बॉर्डर २' चित्रपटासाठी वरुण धवनवर टीका करणाऱ्यांना सुनील शेट्टी यांनी फटकारले

सर्व पहा

नवीन

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करतील

हृतिक रोशनच्या पायाला दुखापत,अभिनेता गंभीर अवस्थेत आढळला

संगीतकार अभिजीत मजुमदार यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन

विक्रम भट्ट आणि त्यांच्या मुलीवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

Kanakaditya Sun Temple दुर्मिळ आणि जागृत सूर्य मंदिरांपैकी एक कनकादित्य मंदिर रत्नागिरी

पुढील लेख
Show comments