Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mi Punha Yein सध्याच्या राजकीय घडामोडीत ‘मी पुन्हा येईन’ प्रकाशझोतात

Webdunia
शुक्रवार, 7 जुलै 2023 (13:09 IST)
Mi Punha Yein
Marathi webseries Mi Punha Yein  सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. राजकारणात उलथापालथ होताना दिसत आहे. हे एकंदरच गरमागरमीचे वातावरण प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘मी पुन्हा येईन’ची आठवण करून देत आहे.  साधारण एक वर्षांपूर्वी प्लॅनेट मराठीवर ‘मी पुन्हा येईन’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व सत्तानाट्य दाखवणाऱ्या या बेवसीरिजला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. यातील डायलॅाग्जही भरपूर गाजले. राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळत आहेत. आता ही वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे आणि निमित्त आहे सध्या सुरू असलेले राजकारण. सध्यथितीवर आधारित जोक्स, मिम्स सर्वत्र झळकत असतानाच या सीरिजमधील काही व्हिडीओज, डायलॅाग्जचे मिम्सही सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे लोकांना ही सीरिज पाहाण्याची उत्सुकता लागली आहे. ही वेबसीरिज सध्य स्थितीशी कशी साधर्म्य साधणारी आहे, यातील प्रत्येक कलाकार आपल्याला कोणाची ओळख करून देतो याबद्दलचे अनेक मिम्स सध्या सर्वत्र शेअर होत आहेत. परिणामी, तापलेल्या राजकीय वातावरणात प्रेक्षकांचे मनोरंजनही होत आहे. 
 
या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, रूचिता जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

आलिया भट्ट आणि शर्वरी चा अल्फा, YRF चा पहिला महिला-प्रधान स्पाय चित्रपट , २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार!

Impostor Syndrome आजाराने त्रस्त आहे अनन्या पांडे, या सिंड्रोम बद्दल जाणून घ्या

आयुष्मान खुरानाने भारताच्या पॅरा ऑलिम्पिक स्टार्सना हृदयस्पर्शी कविता समर्पित केली

करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता, जिंकले हे बक्षीस

सर्व पहा

नवीन

बंड्याने गुरुजींसाठी चष्मा बनवला

तुम्ही दागिने घेत का नाही?

33 वर्षांनंतर पडद्यावर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन जोडीचा धमाकेदार ट्रेलर वेट्टयान रिलीज

सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा

चंद्रघंटा देवी मंदिर प्रयागराज

पुढील लेख
Show comments