Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मी पण सचिन’ १ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर…

Webdunia
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (14:49 IST)
सचिन.... हे नाव घेतले कि, सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर ! भारतातील लाखो क्रिकेटवीरांसाठी सचिन एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. भारताच्या प्रत्येक गल्ली बोळ्यात आपल्याला असे अनेक महत्वाकांक्षी सचिन दिसून येतील, कि ज्यांनी सचिनला आदर्श ठेवत मैदानात रणशिंग फुंकले आहे.
 
नुकताच 'मी पण सचिन' या सिनेमाचा पोस्टर सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं. या सिनेमात मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी झळकणार आहे. पोस्टरवर  स्वप्नील जोशी आपल्याला क्रिकेट किट मध्ये म्हणजेच क्रिकेट हेल्मेट घालून दिसत आहे आणि याच पोस्टर वर ( Dont Stop Chasing Your Dream ) आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे थांबवू नका अशी टॅग लाईन सुद्धा दिसून येत आहे.
 
गणराज असोसिएटसने आतापर्यंत अनेक चित्रपटांची प्रस्तुती आणि निर्मिती केली आहे ज्यामध्ये 'मी पण सचिन' या चित्रपटाचा देखील समावेश होत आहे. विशेष म्हणजे, मराठी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव यात लेखक आणि दिग्दर्शक अश्या दुहेरी भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. पोस्टर मध्ये स्वप्नील जोशी आपल्याला एका दमदार क्रिकेटपटू सारखा दिसून येत आहे. आणि पोस्टरवर असणारी टॅग लाईन सुद्धा प्रेक्षकांची अपेक्षा उंचावणार यात काही वाद नाही. हा सिनेमा भविष्यात सचिन होऊ इच्छिणाऱ्या एका महत्वाकांक्षी क्रिकेटपटूवर आधारित आहे का? असा प्रश्न पडतो. शिवाय स्वप्नील जोशी यात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे देखील गुपित आहे. गणेश गीते व नीता जाधव यांची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या नववर्षात १ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या भेटीला येत आहे. हा सिनेमा भारतातील क्रिकेटवेड्या तरुणाईंचे भावविश्व मांडणारा ठरेल अशी आशा आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments