Marathi Biodata Maker

मृण्मयी - राहुल पुन्हा एकत्र

Webdunia
गुरूवार, 11 एप्रिल 2019 (10:58 IST)
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या '१५ ऑगस्ट' या मराठी चित्रपटात झळकलेली फ्रेश जोडी म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे. '१५ ऑगस्ट' या चित्रपटाच्या यशानंतर ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समजू शकले नसले तरी या चित्रपटात मृण्मयी एका 'ट्रॅव्हलर'च्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजतेय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन मृन्मयीनेच केले आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मृण्मयीचा नवा 'लूक' व्हायरल होत होता. हा तिचा लूक कशासाठी याची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच तिचा हा लूक या चित्रपटासाठी असल्याचे उघडकीस आले आहे. मृण्मयी आणि राहुलला दुसऱ्यांदा एकत्र पाहायला मिळणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
राहुलची चित्रपटातील भूमिका अजूनतरी गुलदस्त्यात आहे. राहुलने याआधी अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून काम केले आहे. शिवाय 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हेंटिलेटर', 'वक्रतुंड महाकाय' 'मुंबई मेरी जान' अशा अनेक गाजलेल्या मराठी, हिंदी चित्रपटांमध्येही त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्याने वेबसिरीजमध्येही आपले अभिनयकौशल्य दाखवले आहे. त्यामुळे आता या चित्रपटात राहुलची काय भूमिका आहे, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री सुधा चंद्रनच्या अंगात आली देवी, व्हिडिओ व्हायरल

16 वर्षांनंतर, माही विज आणि जय भानुशाली यांनी त्यांच्या विभक्ततेची घोषणा केली

बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणेला अटक

आर.डी. बर्मन पंचम दा कसे बनले, वयाच्या 9 व्या वर्षी पहिले गाणे रचले

रजनीकांत यांच्या 'थलाईवर 173' या चित्रपटाच्या नवीन दिग्दर्शकाची घोषणा

पुढील लेख
Show comments