suvichar

दुष्काळग्रस्त भागात पार पडले 'पिप्सी' चे शुटींग

Webdunia
बुधवार, 4 जुलै 2018 (15:27 IST)
'अ बॉटल फूल ऑफ होप' अशी टॅगलाईन असणारा 'पिप्सी' हा आशयघन सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' हा सिनेमा महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर आधारित आहे. त्यामुळे, सिनेमा वास्तवदर्शी होण्यासाठी 'पिप्सी' सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भात करण्यात आले आहे. यवतमाळ येथील अरणी तालुक्यात एन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्यामुळे, चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा तडाका सोसावा लागला होता.
पाण्याची कमतरता, चाहुबाजूस केवळ सुकलेले रान आणि ३५ डिगरीहून अधिक तापमान असणाऱ्या या भागात बालकलाकारांसोबत चित्रीकरण करणे आव्हानास्पद होते. कारण प्रचंड उन्हामुळे मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशीच्या घशाला चित्रीकरणादरम्यान सतत कोरड पडत होती. तसेच अतिउष्णतेमुळे त्यांची तब्येतदेखील बिघडण्याची दाट शक्यता होती. मात्र, या दोघांनी या खडतर वातावरणाचा परिणाम आपल्या कामावर पडू न देता, आपापला अभिनय चोख बजावला. विशेष म्हणजे, त्यानंतर पार पडलेल्या ५५ व्या राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये 'पिप्सी' सिनेमातील भूमिकेसाठी मैथिलीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारदेखील देण्यात आला. शिवाय साहिल जोशी यानेदेखील 'रिंगण' सिनेमासाठी २०१६ सालच्या ५३ व्या राज्यपुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा सन्मान मिळवला असल्यामुळे, 'पिप्सी' सिनेमातील त्याच्या कसदार अभिनयावर दुष्काळी वातावरणाचा तसूभरही परिणाम झाला नाही. अश्याप्रकारे राज्यपुरस्कार विजेते असलेल्या दोन बालकलाकारांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना दर्जेदार अभिनयाची अनुभूती देणारा ठरणार आहे. लहान मुलांच्या निरागस डोळ्यातून सादर होत असलेली 'पिप्सी' ची ही बाटली प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच वास्तविकतेकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोनदेखील देऊन जाणार आहे, हे निश्चित ! 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्टार प्लस आणि ‘तारा’ने मिळून "परदेसिया" या सुप्रसिद्ध गाण्याला दिला नवा ट्विस्ट!

अनुपमाच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी व्यक्त केल्या भावना!

"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये या वर्षातील सर्वात मोठा सामना; अर्जुन रामपाल रणवीर सिंग विरुद्ध उभा

अक्षय कुमारचा 'भूत बांगला' चित्रपटाचा हास्यास्पद टीझर प्रदर्शित

Kumbh viral girl Monalisa married with Muslim boyfriend "मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली" महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा लग्नाबद्दल दिग्दर्शकाचा दावा

सर्व पहा

नवीन

Popular Indian tourist destinations काश्मीर ते गोवा पर्यंत भारतातील ही पर्यटन स्थळे आहे जगप्रसिद्ध

प्रसिद्ध YouTuberअनुराग डोभालची प्रकृती गंभीर ICU मध्ये दाखल

अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीने धुमाकूळ घातला, 'भूत बंगला 'च्या टीझरने यूट्यूबवर 55 दशलक्ष व्ह्यूज ओलांडले

एकता कपूरने 'हुनर' टॅलेंट कंपनी सुरू केली, कलाकारांसाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले

एकेकाळी तब्बूच्या साड्या इस्त्री करणारा रोहित शेट्टी आज बॉलिवूडचा सर्वात मोठा अ‍ॅक्शन डायरेक्टर

पुढील लेख
Show comments